बॉलिवूडमध्ये रॉकस्टार चित्रपटाने पदार्पण करणारी नरगिस फक्री ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपटात आयटम नंबरवर नृत्य करताना दिसणार आहे. या आयटम साँगच्या चित्रिकरणावेळी नरगिसच्या पाठीला दुखापत झाली होती. मात्र, आता आपण ठिक असून चित्रीकरणासाठी सेटवर जाणार असल्याचे नरगिसने ट्विट केले आहे. या आयटम नंबरचे नृत्य दिग्दर्शन बॉस्को-सिझर करत असून संगीत प्रितमने दिले आहे. इलियाना डिक्रुझ आणि शाहिदची मुख्य भूमिका असलेला ‘फटा पोस्टर निकला हिरो’ हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
तसेच, जॉनसोबत नरगिस फक्रीची भूमिका असलेला ‘मद्रास कॅफे’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा