रणबीर कपूरसोबत ‘रॉकस्टार’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अमेरिकेची टॉप मॉडेल आणि किंगफिशरच्या कॅलेंडरवर झळकणारी नरगिस फक्री काही वेळापासून चित्रपटसृष्टीपासून दुरावली आहे. मात्र, शाहीदचा आगामी चित्रपट ‘फटा पोस्टर निकला हिरो’मध्ये नरगिस आयटम नंबरवर थिरकताना दिसण्याची शक्यता आहे. हा आयटम नंबर प्रितम संगीतबद्ध करणार असून नृत्य दिग्दर्शन बॉस्को-सिझर यांचे असेल. या चित्रपटात शाहिदसोबत इलियाना डीक्रुझ मुख्य भूमिकेत आहे.
जॉनसोबत नरगिस फक्रीची भूमिका असलेला ‘मद्रास कॅफे’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader