इम्तियाज अलीच्या रॉकस्टारमधून रनबीर कपूरसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करणारी नर्गिस फाक्री ब-याच कालावधीनंतर डेविड धवन दिग्दर्शित व वरूण धवनची प्रमुख भूमीका असलेल्या ‘मै तेरा हिरो’ मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रॉकस्टारनंतर कोणताही चित्रपट न स्विकारणा-या नर्गिसने दरम्यानच्या काळात जॉन अब्राहमची भूमिका असणा-या ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटाचे चित्रिकरण पार पाडले. त्याचबरोबर अक्षय कुमारची भूमिका असणा-या ‘शौकीन’च्या रिमेकमधून ती दिसणार आहे. मॉडेलींगमधून चित्रपट क्षेत्राकडे वळलेल्या नर्गिससाठी ‘मै तेरा हिरो’ चित्रपट अत्यंत महत्वाचा असणार आहे.
‘मै तेरा हिरो’ २०१४ मध्ये प्रदर्शित होणार असून येत्या जून पासून चित्रपटाच्या चित्रिकरणाला प्रत्यक्षात सुरूवात होईल. या चित्रपटातील नर्गिसची महत्वाची भूमिका असून अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. याआधी बर्फी फेम अभिनेत्री इलीयाना डिक्रुझला चित्रपटासाठी करारबध्द करण्यात आले आहे आणि आता तिच्यासोबत नर्गिसचीही या चित्रपटात वर्णी लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा