बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नरगिसने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या रॉकस्टार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यासाठी तिला बेस्ट डेब्यू हा फिल्मफेअरचा अवॉर्डही देण्यात आला होता. पण तिची या चित्रपटातली भूमिका आणि तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. एकवेळ अशी होती की लोक तिच्या ओठांवर कमेंट केल्या होत्या. त्यावर नरगिसने एका मुलाखतीत वक्तव्य केले होते.

रॉकस्टार हा चित्रपट एक रोमॅन्टिक चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाची कथा एका रॉकस्टारच्या अयशस्वी लव्ह लाईफविषयी दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले तर एआर रहमान आणि मोहित चौहानने या चित्रपटाला संगीतबद्ध केले आहे. या चित्रपटातली गाणी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

आणखी वाचा : “हत्ती खूप झाले आहेत आता माहूत पाठव…’, संदीप देशपांडेंनी सांगितला राज साहेबांचा ‘तो’ मजेदार किस्सा

तिच्या ओठांवर होणाऱ्या चर्चेवर बोलताना नरगिस म्हणाली, “ठीक आहे, मला काय बोलावे ते समजत नाही. गंभीरपणे. जर माझे ब्रेस्ट मोठे असते तर लोक माझ्या ब्रेस्ट बद्दल बोलले असते. मला असं वाटतं की त्यांनी माझे हिप्स अजून पाहिले नाहीत कारण तेदेखील मोठे आहेत. त्या चित्रपटातील भूमिकेसाठी मी पटियाला परिधान केला होता आणि याच कारणामुळे माझे हिप्स दिसले नाही. जर त्यांनी माझे हिप्स पाहिले असते जे माझ्या ओठांपेक्षा मोठे आहेत, तर त्या लोकांनी माझ्या हिप्सबद्दल चर्चा करत असते. संपूर्ण चित्रपटात मी जे कपडे परिधान केले होते त्यामुळे माझं संपूर्ण अंग हे झाकलं गेलं होतं. त्यामुळे ते दुसरं काही बोलू शकले नाही. मला या सगळ्या गोष्टीता फरक पडत नाही.”

Story img Loader