‘कोर्ट’ चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाल्यापासून चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. सर्वत्र त्याची प्रशंसा केली जात आहे. मात्र, बॉलीवूड अभिनेता नसिरुद्दीन शाहा हे ऑस्कर पुरस्कारापासून फारसे प्रभावित झालेले नाहीत.
‘चार्ली के चक्कर मे’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांना ‘कोर्ट’च्या ऑस्कर नामांकनाबद्दल एक्स्प्रेच्या वार्ताहराने विचारले. त्यावर नसिरुद्दीन म्हणाले की, मला ऑस्करबद्दल काहीचं वाटत नाही. ‘कोर्ट’ हा अतिशय चांगला चित्रपट आहे. पण, त्याच्या नामांकनाने इतके हुरळून जाण्याची गरज नाही. ऑस्कर नामांकनानंतर ‘कोर्ट’ चित्रपटाबाबत होत असलेल्या चर्चेबाबत नापसंती व्यक्त करत ते म्हणाले की, चित्रपटाला लोकांची पसंती मिळाली हेच चित्रपटकर्त्यांना पुरेसे असायला हवा. आपल्या देशात त्याची सर्वाधिक प्रशंसा केली गेलीयं आणि हेच महत्त्वाचे आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘कोर्ट’ ‘सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट’ या श्रेणीसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा