विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळाले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २४६ कोटींचा कमाई केली आहे. चित्रपटप्रदर्शित झाल्यापासून बराच वाद झाला होता. काही लोकांनी चित्रपटाच्या बाजूने तर काहींनी विरोधात वक्तव्य केले. आता दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनीही या चित्रपटाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीने ४७ व्या वाढदिवसानिमित्त स्वतःला भेट दिली एक लक्झरी व्हॅनिटी व्हॅन, पाहा फोटो

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टीका केली. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांना वेदना आणि त्यांचे दुख: हे काल्पनिक आहे. काश्मिरी हिंदूंची सुरक्षा आणि पुनर्वसन सुनिश्चित करण्याऐवजी सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे, असेही ते म्हणाले. नसीरुद्दीन यांचा व्हिडीओ शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केले आहे. “मी देखील सहमत आहे. तुमच्या स्वतःच्या देशात काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराबद्दल बोलल्याबद्दल तुम्हाला शिवीगाळ आणि दंड ठोठावण्यात येतो”, अशा आशयाचे ट्वीट विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.

आणखी वाचा : Kon Honar Crorepati 6 : “मी मराठीतून प्रश्न विचारणार”, हे ऐकताच काजोलन केले असे काही

आणखी वाचा : Mahima Chaudhry Breast Cancer : महिमा चौधरीला स्तनाचा कर्करोग, अनुपम खेर यांनी शेअर केला केमोथेरपीनंतरचा व्हिडीओ

‘द कश्मीर फाईल्स’ला मिळालेले अफाट यश पाहून विवेक अग्निहोत्रीने आपला पुढचा चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स’ बनवण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर ही माहिती देताना म्हणाले, “खूप साऱ्या दहशतवादी संघटना,पाकिस्तानी लोक,कॉंग्रेस,आम आदमी पार्टी आणि आता शिवसेना तसंच अर्बन नक्षलवादी देखील मला ‘द काश्मिर फाईल्स २’ संदर्भात विचारत आहेत. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की मी कुणालाच निराश करणार नाही. फक्त तुम्ही आपली इम्युनिटी वाढवायला सुरुवात करा.”