बॉलीवूड अभिनेता नसिरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाह हा फराह खानच्या ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटात भूमिका करणार आहे. विवान म्हणाला की, हो… चित्रपटात मी महत्वाची भूमिका साकारणार आहे. पण, आता याबाबत मी अधिक काही सांगू शकत नाही. या चित्रपटात काम करण्यासाठी मी फार उत्सुक आहे.
तसेच, विवान हा अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये एका तरुण ख्रिश्चन मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो अनुरागचा चाहता असून या चित्रपटामुळे त्याच्यासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे विवानने सांगितले. ‘बॉम्बे वेल्वेट’च्या चित्रिकरणास विवानने सुरुवात केली असून चित्रपटातील बहुतेक दृश्ये श्रीलंकेत चित्रीत करण्यात येणार आहेत. विवानने यापूर्वी ‘सात खून माफ’ चित्रपटातही भूमिका केली आहे.
‘हॅप्पी न्यू इयर’ आणि ‘बॉम्बे वेल्वेट’ हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader