बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता नरीरुद्दीन शाह यांचा आज वाढदिवस आहे. नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या खास अभिनयासाठी ओळखले जाता. नसीरुद्दीन शाह यांनी १९७५ सालामध्ये आलेल्या ‘निशांत’ या सिनेमातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या सिनेमात त्यांची भूमिका छोटी असली तरी त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

अभिनयासोबत नसीरुद्दीन त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चांगलेच चर्चेत आले होते. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी नसीरुद्दीन यांची एक गर्लफ्रेण्ड होती. मात्र नसीर हे दिसायला एखाद्या हिरोप्रमाणे नाही असं म्हणत तिने नसीर यांच्याशी ब्रेकअप केलं.

खासगी आयुष्यासोबतच नसीरुद्दीन शाह सिनेमातील बोल्ड सीनमुळे अधिक चर्चेत राहिले. ‘डर्टी पिक्चर’, ‘सात खून माफ’, ‘बेगम जान’ आणि ‘डेढ़ इश्किया’ या त्यांच्या नंतरच्या काळातील सिनेमात जास्त वय असूनही नसीर यांनी दिलेल्या बोल्ड सीनमुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

 

नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांची खास लव्ह स्टोरी

नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक यांच्याशी विवाह केलाय. नसीर यांचा हा दुसरा विवाह आहे.  रत्ना पाठक या नसीरुद्दीन यांच्याहून १३ वर्ष लहान आहेत. १९७५ सालामध्ये रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन यांची पहिली भेट झाली होती. ‘संभोग से सन्यास’ या नाटकाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. असं असलं तरी प्रेम मग लग्न या सर्व गोष्टी दोघांसाठी सोप्या नव्हत्या. एका मुलाखतीत रत्ना पाठक यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. त्या म्हणाल्या, “पहिल्या भेटीत प्रेम वैगरे असं काही आमच्या बाबतीत घडलं नव्हत. पहिल्या भेटीत आम्ही फार बोललो देखील नाही. मात्र हो दुसऱ्या भेटीनंतर आम्ही थेट एकमेंकासोबत फिरू लागलो.” नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक सात वर्ष एकमेकांना डेट करत होते.

हे देखील वाचा: “पैसै कसे कमवता?”; ‘द कपिल शर्मा शो’मधील राज कुंद्राचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
नसीरुद्दीन २० वर्षांचे असताना त्यांनी वयाने १५ वर्ष मोठ्या असलेल्या मनारा सिकरी यांच्यासोबत विवाह केला होता. मनारा यांना परवीन मुराद या नावाने देखील ओळखलं जात होतं. दिवंगत अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच्या त्या बहिण होत्या. मात्र नसीरुद्दीन आणि मनारा यांच्या नात्यात काही काळाने तणाव निर्माण झाला. याच काळात नसीरुद्दीन यांची भेट रत्ना यांच्याशी झाली आणि त्यांच्यात जवळीक वाढली. मनारा यांना घटस्फोट न देताच नसीरुद्दीन रत्ना पाठक यांच्यासोबत लिव्हइनमध्ये राहू लागले. काही काळाने मनारा आणि नसीरुद्दन यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर  १९८२ सालामध्ये रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन यांनी लग्नगाठ बांधली.

नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांना इमाद आणि विवान ही दोन मुलं आहेत. तर नसीर आणि मनारा यांची मुलही हीबा देखील नीसीर आणि रत्ना पाठक यांच्यासोबतच राहते.