Natasa Stankovic Hardik Pandya Divorce : अभिनेत्री व मॉडेल नताशा स्टॅनकोविक क्रिकेटपटू हार्दिक पंड्यापासून विभक्त झाली. दोघांनी जुलै महिन्यात घटस्फोटाची घोषणा केली. या जोडप्याला मुलगा असून त्याचे नाव अगस्त्य आहे. नताशा मूळची सर्बियाची आहे. ती मुलगा अगस्त्यसह सर्बियात असताना तिने घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यामुळे अनेकांना वाटलं की हार्दिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती मुलाला घेऊन कायमची भारत सोडून सर्बियाला गेली. मात्र, काही दिवसांनी नताशा भारतात परतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नताशाने हार्दिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर कामाला प्राधान्य देत असल्याचं म्हटलं आहे. नताशा आता कामावर परतली असून तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नताशाने सांगितलं की ती व हार्दिक अगस्त्याचे सह-पालक आहेत. ती सर्बियाला काही दिवसांसाठी गेली होती, कायमची नाही. तिने भारत सोडून सर्बियामध्ये स्थायिक होण्याच्या सर्व अफवा फेटाळल्या आहेत.

हेही वाचा – ९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर

भारत सोडून जाणार नाही – नताशा

नताशा म्हणाली, “मी परत जाणार आहे, अशी चर्चा होती, पण मी परत कशी जाणार? माझा एक मुलगा आहे, तो इथे शाळेत जातो. त्यामुळे मी परत जाणं शक्यच नाही. मी परत जाणार नाही. माझ्या मुलाने इथे राहणं गरजेचं आहे, कारण तो इथला आहे. शेवटी त्याचे कुटुंब इथे आहे. आम्ही (हार्दिक आणि ती) अजूनही एक कुटुंब आहोत आणि मुलामुळे आम्ही कायम कुटुंबच राहू.” मागील १० वर्षांपासून दरवर्षी काही दिवसांसाठी सर्बियाला जात असल्याचं नताशाने सांगितलं.

नताशा व तिचा मुलगा अगस्त्य (फोटो – इन्स्टाग्राम)

स्वतःच्या व अगस्त्यच्या आनंदासाठी तिला काम करणं गरजेचं वाटत, असं नताशाने स्पष्ट केलं. मागील पाच वर्षे तिने फार काम केलं नाही, मात्र त्याबद्दल काही पश्चाताप नाही, कारण त्यापैकी चार वर्षे तिने तिच्या मुलाबरोबर खूप चांगला वेळ घालवला. सिंगल मदर म्हणून मुलाचे संगोपन करण्याचा अनुभव तिने सांगितला. “मी अगस्त्यवर प्रेम करताना स्वतःवर प्रेम करायला शिकले. मला समजलंय की माझा मुलगा आनंदी राहावा, यासाठी त्याची आई म्हणून मी आनंदी आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्याची गरज आहे,” असं नताशा म्हणाली.

हेही वाचा – “मला ती आवडली होती, पण..”, कमल हासन यांनी सारिकाबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिला खूप अपमानास्पद…”

नताशाला तिचं आयुष्य खासगी व साधं असावं असं वाटतंय. तिला फक्त काम करायचं आहे. तसेच आयुष्य सध्या शांततेत जगत असून प्रत्येकाला मी आवडू शकत नाही, याची जाणीव असल्याचं नताशाने सांगितलं. आयुष्यातील विशिष्ट टप्प्यावर आलेल्या काही आव्हानांवर पुस्तक लिहायचा विचार करतेय, असं नताशा म्हणाली. नताशाने ‘बिग बॉस’ आणि ‘नच बलिये’ सारखे शो केले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natasa stankovic reacts on divorce from hardik pandya agastya needs to stay with both parents hrc