दिग्दर्शक मधुर भांडारकर हा बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. वैविध्यपूर्ण विषयांवर तो चित्रपट बनवत असतो. तर आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया या चित्रपटात काम करत आहे. सध्या हे दोघे त्यांच्या आगामी ‘बबली बाउन्सर’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया एका हटके भूमिकेत दिसणार आहे.
या ट्रेलरमध्ये आपल्याला तमन्ना बबली नावाच्या मुलीची भूमिका करत आहे, चित्रपटाची पार्श्वभूमी हरियाणातील दाखवली आहे. या मुलीचे वडील (सौरभ शुक्ला) एक पैलवान आहेत. ते असोला फतेहपूर येथील त्याच्या आखाड्यात कुस्तीपटूंना प्रशिक्षण देतात आणि बबली त्याचा सर्वात हुशार विद्यार्थी आहे. ती १० वी बोर्डाची परीक्षा पूर्ण करू शकली नाही, म्हणून जेव्हा तिला तिच्या गावातून बाहेर पडून शहरात महिला बाउंसर म्हणून काम करण्याची संधी मिळते . तमन्नाची बबली हळवी, बबली आहे आणि कोणाला घाबरणारी नाही असे पात्र दाखवण्यात आले आहे.
दिग्दर्शक मधुर भांडारकर आपल्या चित्रपटांमधून कायमच सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. त्यांच्या चित्रपटांमध्ये स्त्री पात्र केंद्रस्थानी असते. तमन्ना भाटिया आणि मधुर भांडारकर पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसून येत आहे. याआधी त्यांनी ‘चांदनी बार’, ‘फॅशन’, ‘कॉर्पोरेट’, ‘पेज ३’ सारखे चित्रपट बनवले आहेत. मधुर भांडारकर यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
दिग्दर्शक मधुर भांडारकरने घेतले अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत लालबागच्या राजाचे दर्शन
मधुर आणि तमन्नाचा ‘बबली बाउन्सर’ हा चित्रपट २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तमन्ना भाटिया या चित्रपटाच्या माध्यमातून मधुर भांडारकरसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. तेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या यशासाठी मधुर भांडारकर आणि तमन्ना भाटिया लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी एकत्र आले होते.