करोनानंतर प्रेक्षक चित्रपट पाहायला चित्रपटगृहापर्यंत येतील की नाही, याबाबत इतर निर्मात्यांप्रमाणेच आम्हीही साशंक होतो. मात्र ज्या पद्धतीने प्रेक्षक आत्ताही मराठी चित्रपटांना प्रतिसाद देत आहेत ते पाहता चांगला चित्रपट असेल तर प्रेक्षक कायम साथ सोबत करतील, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे, अशी भावना राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी व्यक्त केली. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘चॅम्पियन्स’ या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दिग्दर्शक म्हणून सातत्याने विविध सामाजिक विषयांवरील चित्रपटांची चोखंदळ वाट निवडणाऱ्या रमेश मोरे यांचा ‘साथ सोबत’ हा नवा चित्रपट सध्या राज्यभरात प्रदर्शित झाला आहे. संपूर्णपणे कोकणात चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटातही लोकांच्या जिव्हाळय़ाचा मुद्दा त्यांनी हाताळला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा