सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘किल्ला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २०१४ साली बर्लीन महोत्सवातही या किल्ल्याने बाजी मारली होती.
११ वर्षाचा मुलगा वडिल वारल्यामुळे आईसह राहायला कोकणात येतो. कोकणात त्याच्या आईची बदली झालेली असते. मित्र नवे, गाव नवे, निसर्ग नवा अशा नवलाईत त्याची शाळा सुरू होते आणि त्याला भेटतो किल्ला…! या चित्रपटात बंड्याची भूमिका साकारणा-या पार्थ भालेरावलाही किल्ला आणि भूतनाथ रिटर्न्स चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. ‘किल्ला’ २६ जूनला तुमच्या भेटीला येतोय.

Story img Loader