National Cinema Day 2024: आज शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जात आहे. हा दिवस म्हणजे चित्रपटसृष्टीशी निगडित असणाऱ्या सर्व लोकांचा उत्सव आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण चित्रपटांच्या निर्मितीसाठी विविध स्तरांतील सर्व प्रकारच्या व्यक्ती मेहनत घेत असतात. त्यामध्ये कलाकारांबरोबरच चित्रपटांच्या निर्मितीपासून ते पडद्यावर चित्रपट सर्वांसमोर येईपर्यंत त्याच्या स्पॉटबॉयपासून पडद्यामागील सर्व तंत्रज्ञ, वितरक, निर्माते, परीक्षक, माध्यम पत्रकार या सर्व घटकांचा समावेश असतो. अरे, पण यात या चित्रपटांना सर्व प्रकारे यशस्वी वा अपयशी ठरविणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घटकाला आपण विसरलोच. अहो, कोण म्हणून काय विचारता, तुम्ही-आम्ही प्रेक्षकच, आणखी कोण असणार.

तर अशा रीतीने चित्रपटांच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणाऱ्या सिने जगतातील व बाहेरून त्यांच्या प्रयत्नांना हातभार लावणाऱ्या छोट्या-मोठ्या सर्व ‘धडपड्या’ मंडळींच्या कौतुकासाठी एकत्र येण्याचा आणि आपले आवडते चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहून आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे.

भारतात गेल्या वर्षी १३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात आला होता; परंतु या वर्षी हा दिवस शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभरातील चित्रपटगृहे सवलतीच्या दरात म्हणजे प्रत्येकी फक्त ९९ रुपयांत तिकिटे उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचा आवडता चित्रपट पाहण्याची किंवा नवीन चित्रपट पाहण्याची ही उत्तम संधी आहे.

National Cinema Day : ९९ रुपयांत चित्रपटाचे ऑनलाइन तिकीट कसे बूक करायचे? जाणून घ्या

राष्ट्रीय चित्रपट दिनाचा उद्देश काय?

राष्ट्रीय चित्रपट दिन हा लोकांना एकत्र आणण्याच्या आणि प्रेक्षकांना वेगवेगळ्या जगात नेऊ शकणाऱ्या चित्रपटाच्या सामर्थ्याची आठवण करून देतो. चित्रपटाबद्दलचे आपले प्रेम साजरे करण्याचा आणि चित्रपट बनविताना केलेल्या मेहनतीचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे.

राष्ट्रीय चित्रपट दिनाचा इतिहास काय?

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI)द्वारे कोविड-१९ महामारीनंतर चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्याच्या स्मरणार्थ २३ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात प्रथम राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात आला. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (@MAofIndia)च्या सहयोगाने

राष्ट्रीय चित्रपट दिनाने अंदाजे ६.५+ दशलक्ष चित्रपटप्रेमींना भारतभरातील चित्रपटगृहांकडे जणू खेचून आणले. त्यामुळे येनकेनप्रकारेन २०२२ मध्ये चित्रपटासाठी उपस्थितीचा नवा विक्रम प्रस्थापित केला गेला. त्यानंतर भारतात गेल्या वर्षी १३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात आला होता.

तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”

राष्ट्रीय चित्रपटाबद्दल महत्त्वाची तथ्ये

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त आपल्या भारतीय चित्रपटांबद्दलची काही महत्त्वाची तथ्ये आणि आकडेवारी खाली दिली आहे.

  • भारतीय चित्रपट उद्योग २६० अब्जांवर जाणार? : भारतात बनलेला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र होता. हा एक मूक चित्रपट होता आणि १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी तो प्रदर्शित केला होता. स्टॅटिस्टाच्या मते, “भारतीय चित्रपट उद्योगाचे मूल्य २०१९ च्या आर्थिक वर्षात १८० अब्ज रुपयांपेक्षा जास्त होते आणि ते आर्थिक वर्ष २०२४ च्या अखेरीस २६० अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.”
  • बॉलीवूड नावाचे गुपित : १९७० च्या दशकात भारतीय सिनेमाने अमेरिकेला मागे टाकले आणि भारत जगातील सर्वांत मोठा चित्रपट निर्माता बनला. मग ‘इंडिया ग्लिट्झ’च्या म्हणण्यानुसार हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’ हे नाव प्राप्त झाले.

गाण्यांचा रेकॉर्ड

एका हिंदी चित्रपटात १०-२० नव्हे, तर तब्बल ७२ गाणी होती. गाण्यांचा हा रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणताही चित्रपट मोडू शकलेला नाही. मग तो चित्रपट कोणता ही तुमच्या मनी उत्फुलून आलेली शंका शमवीत स्पष्ट करतो की, ‘इंद्रसभा’, असे १९३२ मध्ये आलेल्या तीन तास ३१ मिनिटांच्या या चित्रपटाचे नाव होते. ‘इंद्रसभा’ची आधारशिला आघा हसन अमानत यांनी १८५३ मध्ये लिहिलेले याच नावाचे उर्दू नाटक होते. जे. जे. मदन हे ‘इंद्रसभा’चे दिग्दर्शक; तर संगीतकार नागरदास होते, जे या चित्रपटानंतर खूप लोकप्रिय झाले. ‘इंद्रसभा’चे वैशिष्ट्य म्हणजे ‘७२ गाणी असलेला हिंदी चित्रपट कोणता‘, असा प्रश्न अनेक महत्त्वाच्या परीक्षांमध्येही विचारला गेलाय.

“मला पहाटे नारळाच्या झाडावर चढायला लावलं, घरी जेवायला बोलावलं अन् सोडून निघून गेला…”; विवेक ओबेरॉयचा अभिनेत्याबाबत खुलासा

भारतीय चित्रपटांचा सुवर्णकाळ

भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ समजून घेणेही आवश्यक आहे. १९५० च्या दशकाला चित्रपट इतिहासकारांनी गौरवशाली काळाचा संदर्भ देत हा भारतीय चित्रपटांचा सुवर्णकाळ असे म्हटले. १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारतातील पहिला चित्रपट तयार झाला, ज्याची निर्मिती दादासाहेब फाळके यांनी केली होती. अनेक उत्कृष्ट उर्दू कवी व लेखकांनी चित्रपट निर्मात्यांसोबत सामाजिकदृष्ट्या अर्थपूर्ण चित्रपट तयार करण्याच्या ईर्षेने काम केले. मेहबूब खान, बिमल रॉय, राज कपूर व गुरू दत्त यांच्यासह तत्कालीन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांनी प्रस्थापित कथासूत्रामध्ये नवीन खोली आणली.

संकलन व संपादन : विजय पोयरेकर