दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सतत चर्चेत असते. ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिकाचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता सध्या रश्मिका तिच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. ही एक अंडरवेअरची जाहिरात असून यामध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशल दिसत आहे. रश्मिकाला या जाहिरातीमध्ये पाहून चाहते संतापले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका यूजरने ‘विकी कौशल आणि रश्मिका मंदाना ही कोणत्या प्रकाराची जाहिरात आहे? तुम्हाला ही मजेशीर वाटत आहे का? या आशयाचे ट्वीट केले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘सध्याच्या काळातील मी पाहिलेली अतिशय वाईट जाहिरात. मला नाही वाटत कोणतीही मुलगी माचो पाहून असे काही करत असेल’ या आशयाचे ट्वीट केले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नाही’ असे म्हणत रश्मिकाला सुनावले आहे. सध्या या जाहिरातीमुळे रश्मिकावर टीका होत आहे.

लवकरच विकी कौशल सरदार उधम, साम बहादूर, मिस्टर लेले या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटांची चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. तर रश्मिका अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्षा’ या चित्रपटात झळकणार आहे. इतकच नव्हे तर ती बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National crush rashmika mandanna trolle on her latest underwear ad with vicky kaushal avb