प्रिया वारियर हे नाव आता सोशल मीडियाला नवीन नाही. या मल्याळम अभिनेत्रीची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली. केवळ भारतातच नाही तर जगभरात तिची लोकप्रियता पसरली. फक्त एका व्हायरल व्हिडिओमुळे ती प्रसिद्ध झाली आणि एका दिवसात इन्स्टाग्रामवर तिने सर्वाधिक फॉलोअर्स मिळवले. त्यापाठोपाठ प्रियाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २०१८ या वर्षभरात गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये प्रियाचं नाव अग्रस्थानी आहे. ‘गुगल इंडिया’कडून बुधवारी ही माहिती जाहीर करण्यात आली.
या वर्षभरात प्रिया वारियर हे नाव आणि तिच्याबाबतची माहिती भारतात सर्वाधिक सर्च केली गेली. तिच्यापाठोपाठ अमेरिकन गायक आणि अभिनेत्री प्रियांचा चोप्राचा पती निक जोनासने बाजी मारली आहे. तर प्रियांका चोप्रा या यादीत चौथ्या स्थानावर आहे. प्रियाच्या ‘ओरु अदार लव्हा’ या मल्याळम चित्रपटाच्या ट्रेलरचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. त्यातील चेहऱ्यावरील हावभाव आणि दिलखेचक अदांनी तिने अनेकांना घायाळ केलं.
वाचा : कलाविश्वात लग्नाचे वारे; ‘बिदाई’ फेम अभिनेत्री पारुल लग्नाच्या बेडीत
प्रिया, निकपाठोपाठ यादीत डान्सर सपना चौधरी, प्रियांका चोप्रा, आनंद अहुजा, सारा अली खान, सलमान खान, मेगन मार्कल, अनुप जलोटा आणि बोनी कपूर यांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर ब्रिटीश राजघराण्याची सून ‘डचेस ऑफ ससेक्स’ मेगन मार्कल गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत अग्रस्थानी आहे.