यंदा दोन वर्षाच्या खंडानंतर राज्यभर दहीहंडी उत्सवाचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं. अनेक नेते मंडळींनी तसेच सेलिब्रिटींनी महाराष्ट्रभरातील विविध दहीहंडी कार्यक्रमांना हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांनी मेगा दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबरीने अमरावतीत आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
आणखी वाचा – परळमध्ये जन्म, तेथील राहणीमान अन्…; पूजा सावंतला आठवले चाळीमधील ‘ते’ जुने दिवस
राणा दाम्पत्याने आयोजित केलेल्या या दहीहंडी कार्यक्रमामध्ये अभिनेता गोविंदाने (Govinda) हजेरी लावली होती. यावेळी गोविंदाने उपस्थित गोविंदा पथकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबरीने त्याने त्याच्या सुपरहिट हिंदी गाण्यांवर डान्स करत उपस्थितांचं मनोरंजन केलं.
पाहा व्हिडीओ
या कार्यक्रमामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आणि तो व्हिडीओ म्हणजे नवनीत राणा आणि गोविंदाचा एकत्रित डान्स. आधी गोविंदानेच आपल्या गाण्यांवर डान्स करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या आग्रहाखातर नवनीत ‘चलो इश्क लडाए सनम’ या गाण्यावर थिरकताना दिसल्या. त्यांचा हा डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
नवनीत यांना डान्स करताना पाहून उपस्थितही अवाक् झाले. या दहीहंडी कार्यक्रमाला गोविंदासह राजकारणातील इतर प्रतिष्ठीत मंडळींनी देखील हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.