गेल्या तीन दिवसांपासून व्हॉट्स अप, हाईक, फेसबुक, ट्विटर आदी सोशलसाईटवर फिरत असलेला नव्या नवेली आणि आर्यन खानचा एमएमएस हा खोटा असल्याचे आता समोर आले आहे. बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांची नात आणि शाहरुखचा मुलगा यांच्यावर एक एमएमएस तयार करण्यात आला होता. या व्हिडिओत तरुण मुलगा आणि मुलगी हे आक्षेपार्ह स्थितीत दाखविण्यात आले होते. मात्र, या व्हिडीओतील जोडप्यांना नव्या नवेली आणि आर्यनचा चेहरा लावण्यात आला असून या व्हिडीओत कोणतेही तथ्य नाही. शाहरुखच्या रेड चिलीजनेही हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी आर्यन आणि नाव्या हे दोघे इंग्लंडमध्ये एका नाईट क्लबमध्ये आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांची नजर होती.  तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरु असल्याचीही चर्चा करण्यात येत होती. याचाच फायदा घेऊन हा एमएमएस तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.