बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा त्याच्या आगामी ‘हद्दी’ चित्रपटातील लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात तो दुहेरी भूमिका साकारत असून रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये एका महिलेच्या वेशात दिसत आहे. त्याच्या लूकची तुलना अर्चना पूरण सिंग यांच्याशीही करण्यात आली होती. दरम्यान, नवाजुद्दीनने अलीकडेच एका मुलाखतीत आपला अभिनेत्रींबद्दलचा आदर वाढला असल्याचं म्हटलंय.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीनने खुलासा केला की, “माझी मुलगी मला पहिल्यांदा महिलांसारखे कपडे घातलेले पाहून नाराज झाली होती. पण आता सगळं ठीक आहे, कारण मी ती एका भूमिकेसाठी केलं होतं, हे तिला कळलंय.” या अनुभवानंतर अभिनेत्रींबद्दलचा आदरही अनेक पटींनी वाढल्याचं नवाजने म्हटलंय. “एखाद्या अभिनेत्रीला तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडण्यासाठी पुरुषांपेक्षा जास्त वेळ का लागतो, ते मला आता कळलंय. त्यांना लागणारा वेळ अपरिहार्य आहे. अभिनेत्रींना फक्त अभिनय करायचा नसतो, तर केस, मेकअप, कपडे, नखं यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात,” असंही नवाजुद्दीन म्हणाला.
“महिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला स्त्री पात्र साकारण्याचा अनुभव
“जर मी एखाद्या महिलेची भूमिका साकारत असेन, तर त्यासाठी मला एका महिलेसारखा विचार करावा लागेल. कपडे, हेअरस्टाइल आणि मेकअप या सर्व गोष्टींसाठी एक्सपर्ट दिले जातात, पण त्या पात्रात प्रवेश करणे ही एक अंतर्गत प्रक्रिया आहे. एका स्त्रीची भूमिका करण्यासाठी तुम्हाला स्त्रीच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो, जो या भूमिकेसाठी मी केला. या संपूर्ण प्रक्रियेतून जाणं हिच माझ्यासाठी ‘हड्डी’ चित्रपटातील सर्वात आव्हानात्मक आणि कठीण बाजू होती,” असंही नवाजुद्दीन आपल्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाला.
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लुकशी होणाऱ्या तुलनेवर अर्चना पुरण सिंग यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
‘हड्डी’ या चित्रपटात नवाजुद्दीन स्त्री आणि ट्रान्सजेंडर अशा दोन्ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका आहे. जवळपास ४ वर्षांपासून नवाजुद्दीन या चित्रपटावर काम करत होता. हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.