‘कान फिल्म फेस्टीव्हल’मध्ये रेड कार्पेटवर उतरणाऱया बॉलीवूड अभिनेत्रींची आपल्याकडे नेहमी चर्चा असते. पण यंदा बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाने ‘कान फिल्म फेस्टीव्हल’मध्ये उपस्थितांची वाहवा मिळवली. नवाजुद्दीनचे कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये जोरदार टाळ्यांनी स्वागत झाले. नवाजुद्दीनची प्रमुख भूमिका असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘रमन राघव २.०’ या चित्रपटाचे ‘कान फिल्म फेस्टीव्हल’मध्ये स्क्रिनिंग झाले. चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थितांनी नवाजुद्दीनच्या कामाचे भरभरुन कौतुक केल्याचे समजते. स्क्रिनिंग संपल्यानंतर नवाजुद्दीच्या एण्ट्रीवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केल्याची एक व्हिडिओ क्लिप ‘आयएएनएस’ने शेअर केला आहे.
चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सुरूवात होण्याआधी अनुराग कश्यपने ‘रमन राघव’चे स्क्रिनिंग सुरू होत असल्याचे ट्विट देखील केले होते. तसेच संपूर्ण हॉल प्रेक्षकांनी तुडूंब भरल्याचेही त्याने ट्विटमध्ये नमूद केले होते.
नुकताच काही दिवसांपूर्वी ‘रमन राघव २.०’ चित्रपटाचा ट्रेलर भारतात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नवाजुद्दीन एका सिरियल किलरची भूमिका साकारत असून चित्रपटाची कथा मुंबईत ६० च्या दशकात घडलेल्या सत्य घटनेवर आधारीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui gets roaring applause at cannes