अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी अर्थातच नवाजुद्दीन सिद्दीकीला बराच संघर्ष करावा लागला. अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात नाव कमावणं त्याच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं. नवाजनं बरेच सुपरहिट चित्रपट दिलेत आणि त्यासाठी त्याला पुरस्कार देखील मिळाले आहेत. पण आता त्याच्या पुरस्करांच्या यादीत आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. नुकतंच नवाजुद्दीन सिद्दीकीला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्याला ग्रॅमी अवॉर्ड विजेता अभिनेता विंसेंट डी पॉल यांच्या हस्ते देण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नावजुद्दीन सिद्दीकीला हा फ्रेंच रिवेरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. त्याला हा पुरस्कार मिळणं देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या आधीही नवाजुद्दीन सिद्दीकीला बऱ्याच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. अभिनय सृष्टीतील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आतापर्यंतच्या कामगिरीसाठी ‘एक्सेलन्स इन सिनेमाज’ हा पुरस्कार त्याला फ्रेंच रिवेरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये देण्यात आला. या क्षणाचे काही फोटो नवाजुद्दीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

आणखी वाचा- Video : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक

दरम्यान याआधी नवाजुद्दीन सिद्दीकीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही हजेरी लावली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात तो ‘टीकू वेड्स शेरू’, ‘नूरानी चेहरा’ आणि ‘अद्भुत’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील ‘टीकू वेड्स शेरू’ हा एक रोमँटीक चित्रपट आहे. ज्यात तो अवनीत कौरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui got international award at french riviera film festival 2022 know details mrj