अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने सलमान, शाहरूख व आमीर या खान त्रयींकडून प्रेरणा मिळाल्याचे म्हटले आहे. या तीनही दिग्गज अभिनेत्यांसोबत त्याने काम केले आहे.
येत्या १७ जुलैला सलमान खानचा बजरंगी भाईजान चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात नवाजने एका पाकिस्तानी पत्रकाराची भूमिका केली आहे. आमीर खानच्या तलाश या चित्रपटातून नावाजलेल्या नवाजने त्यानंतर राहूल ढोलकिया दिग्दर्शित रईस या चित्रपटात शाहरूख खानसबोत अभिनय केला. यापूर्वी नवाजने कीक या चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावली होती, याच चित्रपटात सलमानने नायकाची भूमिका बजावली होती, इथेच सलमान व नवाझ यांचे चांगले जमल्याने त्याला ‘बजरंगी भाईजान’ने आपल्या चित्रपटात अभिनय करण्याची पुन्हा संधी दिली. नवाज गंभीर अभिनय करत असल्याचे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत असून काही विनोदी दृश्यही आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा