बॉलीवूड सेलिब्रिटी सुट्टी घालवण्यासाठी लंडन, युरोप यांसारख्या भारताबाहेर असलेल्या ठिकाणी जातात. मात्र, याला अपवाद असा अभिनेता बॉलीवूडमध्ये आहे. तो म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. भारताबाहेर फिरायला जाण्यापेक्षा नवाजुद्दीनने आपल्या गावी उत्तर प्रदेशला जाणे पसंत केले. तो केवळ गावी गेला नाही तर त्यांच्या शेतात त्याने कामही केले.
सध्या पाठोपाठ चित्रपट करत असलेल्या नवाजुद्दीनला सुट्टीची गरज होती. गावात राहत असलेली त्याची आई आणि भाऊ सारखे त्याला तेथे येण्यास सांगत होते. मात्र, नवाजुद्दीनला कामातून वेळ मिळत नसल्यामुळे त्याचे गावी जाणे होत नव्हते. पण, यावेळी त्याने वेळ काढून त्याचे गाव तर गाठलेचं पण शेतीही केली. त्याचा एक फोटो ट्विटरवर त्याने प्रसिद्ध केला आहे.

Story img Loader