बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दिन कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या पत्नीमुळे चर्चेत आला आहे. तर आता नवाजुद्दीन हा त्याच्या बंगल्यामुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीनने एका मुलाखतीत खुलासा केला की नव्या बंगल्याच्या डिझाइनचे काम सुरु असताना ते कसे असले पाहिजे याविषयी स्वत: नवाजुद्दीनने ठरवले होते. दरम्यान, तब्बल ३ वर्ष त्याच्या या नव्या बंगल्याचं काम सुरु होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवाजुद्दीनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या बंगल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नवाजुद्दीनच्या फोटोची चर्चा सुरु झाली आहे. नवाजुद्दीनने नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत नवाजुद्दीन त्याच्या बाथरुमविषयी बोलला आहे. “आज माझं पर्सनल बाथरुम जेवढं मोठं आहे, तेवढं माझं जुनं घरं होतं,” असं नवाजुद्दीन म्हणाला.

आणखी वाचा : Viral Video : ‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकरने पंचतारांकित हॉटेलमध्ये केला लाइव्ह परर्फोमन्स, प्रेक्षक भारावले

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ फेम बबीताने सुरु केलं रेस्टॉरंट, अभिनय क्षेत्राला करणार रामराम?

पुढे नवाजुद्दीन म्हणाला, “त्याला त्याच्या घरात दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांचे ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर लावायचे आहेत. घरात आल्यावर असं वाटलं पाहिजे की हे एका आर्टिस्टचं घर आहे.”

आणखी वाचा : सुप्रिया सुळेंनी लावली होती अंबानींच्या मुलाच्या लग्नाला हजेरी, पाहा फोटो

पुढे त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाच्या आठवणी सांगत नवाजुद्दिन म्हणाला, तेव्हा आम्ही एका फ्लॅटमध्ये तीन जणं मिळून रहायचो, म्हणजे भाडं विभागून देणं परवंडायचं. २०१२ मधील ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटाच्या यशानंतर नवाजुद्दिनचं नशीबच पालटलं. पण तोपर्यंत मात्र तो चित्रपटसृष्टीत काम मिळण्यासाठी अनेक प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याने अनेक घरं बदलली. पण तेव्हा इतर काही यशस्वी अभिनेत्यांना डोळ्यासमोर ठेवत. आपलाही स्वतःचा मुंबईत एक बंगला असेल असं स्वप्न पाहिलं आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui shifts to new bungalow but people are talking about his bathroom dcp