मुंबई लोकल आणि बॉलिवूड कलाकार यांचं एक खास नातं आहे. अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये येण्याआधी प्रवासासाठी लोकलचा आधार घेतला आहे. एवढंच नाही तर वेळेची बचत म्हणून अनेकदा सेलिब्रेटी आजही लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसतात. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. नुकताच एका प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो लोकलमधून प्रवास करताना दिसतोय मात्र या प्रवासात त्याला कोणीही ओळखलेलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हा अभिनेता मास्क आणि गॉगल लावून स्टेशनवर येताना दिसत आहे. एवढंच नाही तर लोकल ट्रेनमधून प्रवासही करताना दिसतोय. मात्र या प्रवासात त्याला कोणीही ओळखलेलं नाही. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची बरीच चर्चा होताना दिसतेय आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून नवाझुद्दीन सिद्दीकी आहे.

आणखी वाचा- RRR च्या यशानंतर राजामौली- आलिया भट्ट यांच्यात वाद? अभिनेत्रीच्या ‘या’ कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष

नवाझुद्दी सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग मीरा रोड येथे करत होता. मात्र त्यानंतर त्याला लगेचच आणखी एका इव्हेंटसाठी जायचं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी त्यानं आपली लग्झरी कार सोडून मुंबई लोकलनं प्रवास केला. त्याच्या या प्रवासाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा- Video: खिल्ली उडवणाऱ्या शाहरुख- सैफला निल नितिन मुकेशनं करुन दिली होती संस्कारांची आठवण

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या कामाबद्दल बोलायचं तर तो शेवटचा ‘सीरियस मॅन’ या चित्रपटात दिसला होता. त्याचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. आगामी काळात त्याच्याकडे ‘हीरोपंती २’, ‘टीकू वेड्स शेरू’, ‘बोले चूड़ियां’, ‘जोगिरा सारा रा रा’ हे चित्रपट आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui takes mumbai local to reach early at work wacth video mrj