सगळं काही व्यवस्थित जुळून आल्यास, आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडला आपली दखल घ्यायला लावणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचे झेंडे फडकवू शकतो. दिग्दर्शक ग्राथ जेव्हिस यांच्या चित्रपटात नवाजुद्दीन हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री निकोल किडमनबरोबर अभिनय करताना दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाची कथा सॅरू ब्रिअरली यांच्या ‘अ लाँग वे होम’ या पुस्तकावर आधारीत आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण भारत आणि ऑस्ट्रेलियात केले जाणार आहे. या चित्रपटात देव पटेल, तनिषा चॅटर्जी आणि दिप्ती नवल यांच्यासुद्धा भूमिका असल्याचे समजते. सध्या राजस्थानमधील मांडवा येथे नवाजुद्दीन सिद्धीकी सलमान खानबरोबर ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पुढील महिन्यात ‘बजरंगी भाईजान’चे चित्रीकरण संपवून परतल्यावर तो या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे कयास बांधले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा