आपल्या अभिनयाने चित्रपट समीक्षकांची वाहवा मिळवणारा बॉलीवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी लवकरच सलमान खानसोबत काम करताना दिसणार आहे. ‘किक’ या आगामी चित्रपटात तो सलमानसोबत काम करणार आहे. ‘गँग ऑफ वासेपूर’मधील त्याच्या अभियनामुळेच साजिद नादियावालाने त्याची निवड केली आहे.
नादियावाला दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असणा-या अ‍ॅक्शनपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. नवाझुद्दीन या नव्या चित्रपटात कोणती भूमिका करणार आहे याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. नवाझुद्दीन सिद्दीकी याने आतापर्यंत ‘गँग ऑफ वासपूर’, ‘कहानी’, ‘तलाश’, ‘लंचबॉक्स’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे आणि त्याच्या अभिनयाबद्दल प्रशंसाही झाली आहे.

Story img Loader