‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या उपक्रमात यंदा  नवाजुद्दीन सिद्दिकी या हरहुन्नरी अभिनेत्याने ‘मंटो’ या त्याच्या आगामी चित्रपटातील अनुभवाचे कथन केले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सादत हसन मंटो या लेखकाच्या कथांमधील व्यापकता सध्याच्या तरुणाईपर्यंत ‘मंटो’ या चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवली जाईल. आजही समाजातील घडामोडीबद्दल बरंच काही बोलायचे असते मात्र त्यांना ते व्यक्त होता येत नाही, याच बाबी मंटो आपल्या कथेतून सांगतो. मंटोचे भाषेवरील प्रभुत्व आणि विचारातील स्पष्टता त्याच्या कथा वाचताना लक्षात येते. ही स्पष्टता इतकी भव्य होती की लोकांच्या गराडय़ात गर्दीच्या ठिकाणीही लिहीत असे आणि या कथांचे त्याने कधीच पुनल्रेखनही केले नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने मला मंटो या लेखकाचे बरेच बारकावे उमगल्याचे नवाजुद्दीन सिद्दिकी सांगतो. अभिनयातील सहजता आणि भूमिकेच्या सादरीकरणाची उत्तम जाण असलेल्या नवाजुद्दीन याने चित्रपटातील लहान किंवा त्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर चित्रपटातील एका सीनमधूनही त्याने प्रेक्षकांवर गारुड केले.

अभिनयाच्या वेडाने उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या नवाजुद्दीन सिद्दिकी याला चित्रपटात शिरकाव करण्यासाठी बरेच चांगले-वाईट अनुभव आले. ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’ या संस्थेत अभिनयाचे शिक्षण घेत असतानाच त्याने अनेक हिंदी प्रायोगिक  नाटकांमध्ये काम केले. याकाळात त्याने मंटो  यांच्या अनेक कथांवरील हिंदी नाटकांवर सादरीकरण केले होते. तरुणाईच्या काळात याच कथांनी आणि अनुषंगाने मंटोनी  नवाजुद्दीनवर प्रभाव टाकला होता. याकाळात त्यांनी मंटोच्या अनेक कथांची पारायणे केली. आणि करिअरच्या उंचीवर चढत असताना मंटो ही भूमिका साकारायला मिळणे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या भूमिकेच्या निमित्ताने समाजापर्यंत अनेक गोष्टी नेऊ शकतो याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. कारण समाजातील परिस्थितीवर कलाकाराची विधाने वादग्रस्त ठरविली जातात. चित्रपटांपूर्वी नाटकांच्या काळाप्रमाणे आताही नाटक किंवा तत्सम क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना गावाच्या वेशीबाहेरच राहायला सांगायला हवे, ही माणसे स्वतंत्र विचारसरणीची असल्याने त्यांचा समाजावर परिणाम होईल ही त्यांना भीती होती असा कुत्सित टोलाही त्याने लगावला.

नवाजुद्दीनची उपस्थिती ही कायम साधी व समोरच्यासाठी सहज असते. चित्रपटात इतकी वर्ष काम करूनही अभिनेत्याकडे असलेला अंह आला नाही हे त्यांचे कौतुक आहे. साधा हिरव्या रंगाचा टिशर्ट आणि काळ्या रंगाची पँट अशा साध्या पेहरावात तो एक्स्प्रेसच्या इमारतीत दाखल झाला. पत्रकारांच्या प्रश्नांना अगदी कमी शब्दात उत्तरे देताना तो काही हातचं राखून बोलत आहे, असाही समोरच्याचा समज होऊ शकतो. चित्रपटात नवाझमध्ये जितका आत्मविश्वास वाटतो तो प्रत्यक्षात किंवा त्याच्याशी बोलताना वाटत नाही. यासंदर्भात त्याला विचारले असता त्याने वेगळेच उत्तर दिले. कॅमेरासमोरील माझे अस्तित्व हे खूप सहज असते. इतकी सहजता मला कुठेच मिळत नाही. याच क्षणात मी स्वत:ला मोकळे करावे असे वाटते. मात्र या समाजात वावरताना, लोकांशी संवाद साधताना मला अभिनय करावा लागतो. समोरच्याचे माझ्याविषयी काय मत असेल, मी कसा दिसतो याबद्दल माझ्या मनात कायम भीती असते, असं तो काहीसा अवघडतच म्हणत होता.

जितकी भाषा चांगली त्याच चांगल्या पद्धतीने आपण व्यक्त होऊ शकतो. मंटो या चित्रपटातील भाषा ही खूप वेगळी आहे. आणि नवाजुद्दीनने काम केलेल्या चित्रपटांमध्ये त्याला भाषेची खेळता आले आणि वेगवेगळा अनुभव मिळाला असल्याचे त्याने सांगितले. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये मला बराच अनुभव मिळाला. त्यावेळी अभिनयासाठी खूप मेहनत घेतली होती. मात्र सुरुवातीच्या काळात अभिनेत्याचा लूक नसल्यामुळे नाकारण्यात आले. पहिली पाच वष्रे मी एक सीनची भूमिका करीत होतो. यातील अनेक चित्रपट मी प्रेक्षकांना सांगूही शकत नाही. मात्र एका वेळेनंतरही मी हे नाकारले. आणि किमान दोन सीनच्या चित्रपटाची मागणी करू लागलो. यावेळी नवाजुद्दीनने आपले अनेक चित्रपट स्वीकारले जात नाही याबद्दल खंतही व्यक्त केली. अनेकदा चांगले चित्रपट प्रेक्षकांकडूनही स्वीकारले जात नाही. नवाजुद्दीनने काम केलेल्या रमण राघव हा चित्रपट प्रेक्षकांना अजिबात आवडला नाही, मात्र यात दाखविण्यात आलेल्या विषय काहीसा टोचणारा असला तरी वास्तववादी होता, असे मत त्याने व्यक्त केले. चित्रपटांशिवाय अनेक विषयांसाठी नवाजुद्दीन चच्रेत राहिला आहे. रामलीला या नाटकादरम्यान झालेल्या वादानंतर माझा आत्मविश्वास वाढला. यावेळी प्रत्येक धर्माची लोकं माझ्यासोबत होती. याचा मला अतिशय आनंद आहे.

सध्याच्या अभिनेत्यांबद्दलची एक वेगळीच बाब त्यांनी यावेळी सांगितली. सध्या मॅथड अभिनयाचे खूळ चित्रपट क्षेत्रात चíचले जात आहे. चित्रीकरणाशिवायही आपल्या भूमिकेत राहणे याला मॅथड अभिनय म्हटले जाते. मात्र दिखावा करण्यासाठीही अनेक अभिनेते आपण मॅथड अभिनय करण्याचा आव आणतात आणि फसतात. याशिवाय नवाज अनेक चित्रपटांच्या निमित्ताने अनेक गोष्टी शिकला आहे, असे तो सांगतो. एका चित्रपटाच्या निमित्ताने तो गोल्फ हा खेळाचा प्रकार शिकला. आणि पुढे मी मोकळ्या वेळेत हा खेळ खेळत असल्याचे त्याने सांगितले. बॉलीवूडमध्ये होणाऱ्या पार्टीपासून नवाजुद्दीन कायम दूर राहतो. या पार्टीमधील  भपकेबाजपणा नवाजला आवडत नाही. चित्रपट क्षेत्रात आपल्या अभिनयाच्या प्रेमाखातर आलेला नवाजुद्दीनने आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. आणि येत्या काळात अशाच वास्तववादी चित्रपटातून तो प्रेक्षकांना आपलेसे करील असा त्याचा विश्वास आहे.

(संकलन-मीनल गांगुर्डे)