समोर कितीही मोठा कलाकार असो, भूमिका कितीही कठीण असो अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. निंदकांच्या तोंडूनही प्रशंसेचेच शब्द बाहेर पडतील अशी नवाजुद्दीनची कामगिरी आहे. त्याच्या अभिनयात कमालीची विविधता आहे.

कोणत्याही गॉडफादरशिवाय चित्रपटसृष्टीत नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या मेहनतीच्या आणि दमदार अभिनयाच्या जोरावर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्याची जीवनकथा आता पुस्तकाच्या स्वरुपात वाचायला मिळणार आहे. ‘द इन्क्रेडीबल लाइफ ऑफ ड्रामा किंग ऑफ इंडिया’ असे नवाजच्या आत्मचरित्राचे नाव असणार आहे.

वाचा : …म्हणून शाहरूखने पहिल्या पगाराचे पैसे आईवडिलांना दिले नाही

पत्रकार रितुपर्ण चॅटर्जी आणि नवाजुद्दीनदरम्यान बातचितच्या स्वरुपात हे आत्मचरित्र लिहिले असून नवाजुद्दीनच्या जीवनप्रवासाचे चित्रण यातून होणार आहे. जीवनातील अडथळे, कठीण प्रसंग, आनंदाचे क्षण या सर्वांवर आत्मचरित्रातून प्रकाश पाडण्यात येणार आहे.

याबद्दल तो म्हणाला की, ‘जवळपास दोन वर्षांपूर्वी आत्मचरित्रावर काम करण्यास सुरुवात केली होती. मी गावी राहात होतो तेव्हापासून ते अभिनेता होईपर्यंतचा माझा प्रवास या आत्मचरित्रात मांडण्यात आलाय. येत्या दोन महिन्यांत आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येईल.’

Story img Loader