दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा सध्या बरीच चर्चेत आहे. नयनतारा लवकरच शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. साऊथ इंडस्ट्रीमध्ये नयनथाराने ‘नेट्रिकॉन’, ‘गॉडफादर’, ‘इरू मुगन’, ‘गोल्ड’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले असून ही अभिनेत्री एक यशस्वी बिझनेसवुमनदेखील आहे.

नयनताराने पती विघ्नेश शिवनसह उत्तर चेन्नईमध्ये अगस्त्य चित्रपटगृहाची जुनी इमारत तिची कंपनी ‘राउडी पिक्चर्स’अंतर्गत विकत घेतली आहे. या चित्रपटगृहामध्ये एमजीआर, शिवाजी गणेशन, रजनीकांत, कमल हसन, अजित कुमार यांसारख्या सुपरस्टार्सचे अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. अगस्त्य चित्रपटगृह जवळपास ५३ वर्षे सुरू होते, परंतु कोरोनामध्ये हे थिएटर बंद करण्यात आले होते. याच दरम्यान येथील स्क्रीनची दुरवस्था झाली.

delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
maharashtrachi hasya jatra show will start again from december prajakta mali shares video
Video : तारीख अन् वेळ ठरली! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार…; प्राजक्ता माळीने शेअर केली सेटवरच्या शूटिंगची झलक
India highest grossing movie in china Secret Superstar
फक्त १५ कोटींचे बजेट, कमावलेले ९०५ कोटी; चीनमध्ये सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलाय का?

हेही वाचा : “कोकणची माणसं साधीभोळी…” मराठमोळी अभिनेत्री गुहागरमध्ये बनवतेय झाडू, नेटकरी मालवणीत म्हणतात “गो बाय…”

भविष्याचे नियोजन करीत नयनतारा आणि तिच्या पतीने या चित्रपटगृहाचे नूतनीकरण करण्याचा आणि त्याचे दोन-स्क्रीन सुविधेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्सने दिली आहे. दोन्ही स्क्रीन्सवर एकाच वेळी हजारहून अधिक लोक बसू शकतील, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : कार्तिक-कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ लवकरच होणार रिलीज, चित्रपटातील शेवटच्या गाण्यासाठी उभारला भव्य सेट

अभिनयाव्यतिरिक्त नयनताराने स्किनकेअर कंपनी सुरू केली असून यामध्ये जवळपास १०० प्रकारचे लिप बाम बनवले जातात, असा दावा तिने काही मुलाखतींमध्ये केला होता. पतीसह सुरू केलेल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये नयनथाराने काही यशस्वी चित्रपटांची निर्मितीही केली आहे. दरम्यान, अभिनेत्री लवकरच शाहरुखबरोबर ‘जवान’मध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.