दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आज फिल्ममेकर विग्नेश शिवनशी लग्नाच्या बेडीत अडकली. नयनताराच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसतेय. मागच्या ७ वर्षांपासून नयनतारा आणि विग्नेश एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता आपल्या नात्याला एक नवी ओळख दिली आहे. पण विग्नेशच्या आधी नयनताराचं खासगी आयुष्य आणि लव्ह लाइफ नेहमीच चर्चेत राहिलं आहे. इंटिमेट फोटो लीक होणं ते अगदी विवाहित असलेल्या प्रभूदेवासोबतचं तिचं गाजलेलं अफेअर सर्वच गोष्टींमुळे तिचं नाव चर्चेत राहिलं आहे.

नयनतारानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात अभिनेता सिम्बूसोबतचं तिचं नातं फार गाजलं होतं. त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही काही महिन्यांतच दोघंही वेगळे झाले मात्र त्यांचे इंटिमेट फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यानं दोघंही बरेच चर्चेत आले होते. या फोटोंमध्ये दोघंही एकमेकांना किस करताना दिसत होतं. लीक झालेले हे फोटोच या दोघांच्या ब्रेकअपचं कारण असल्याचं बोललं जातं. सिम्बूने पब्लिसिटीसाठी हे फोटो लीक केले होते असा आरोपही झाला होता. अनेक वर्षांनंतर यावर मौन सोडताना सिम्बूने हे फोटो दुबईमध्ये क्लिक करण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी त्याने नवीन कॅमेरा घेतला होता. मात्र या वादामुळे त्याला बराच मानसिक त्रास झाल्याचंही त्यानं सांगितलं होतं.

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”
Why did Deputy Chief Minister Ajit Pawar hide the photo from his visit to New Delhi print politics news
अजित पवारांनी ‘तो’ फोटो का लपविला ?

सिम्बूनंतर नयनताराच्या आयुष्यात दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवाची एंट्री झाली. दोघांनीही ‘विल्लू’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. जून २००९ साली नयनतारा आणि प्रभूदेवा लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. २०१० साली प्रभूदेवानं त्याचं नयनतारासोबत अफेअर असल्याचं मान्य करत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एवढंच नाही तर नयनतारानं तिच्या मनगटावर प्रभूदेवाच्या नावाचा टॅटू देखील बनवून घेतला होता. पण या नात्यातील सर्वात धक्कादायक गोष्ट ही होती की, त्यावेळी प्रभूदेवा विवाहित होता. पण तरीही त्यानं नयनतारावर प्रेम असल्याचं जाहीर केलं होतं.

आणखी वाचा- “मी पॉर्नस्टार होते त्यामुळे…” मुलांबाबत सनी लिओनीला सतावतेय ‘ही’ भीती

नयनतारा आणि प्रभूदेवाच्या आयुष्यात सर्वकाही ठीक चाललं होतं पण जेव्हा प्रभूदेवा यांच्या पत्नीनं घटस्फोट देण्यास नकार दिला तेव्हा हे प्रकरण न्यायलयात पोहोचलं. प्रभूदेवाची पत्नी लताने त्याच्यावर विवाहित असताना अफेअर आणि कुटुंबाला आर्थिक पाठबळ न दिल्याचा आरोप केला. यावरून बराच वाद झाला आणि अखेर लता आणि प्रभूदेवा यांचा घटस्फोट झाला. दरम्यानच्या काळात नयनताराने चित्रपटांतून ब्रेक घेतला. पण २०११ साली या दोघांचं लग्न होण्याआधीच ब्रेकअप झालं. याचं कारण प्रभूदेवानं नयनताराला लग्नासाठी कोणतीही कमिटमेंट न देणं हे सांगितलं गेलं.

आणखी वाचा- ‘तारक मेहता’मध्ये पुन्हा दिसणार दिशा वकानी? असित मोदी म्हणाले, “दयाबेनच्या भूमिकेसाठी…”

नयनतारा आणि प्रभूदेवा वेगळे झाल्यानंतर नयनताराला विग्नेशच्या रुपात तिचं प्रेम मिळालं. २०१५ साली त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. एका चित्रपटाच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. मागच्या ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.

Story img Loader