Dhanush Nayanthara Dispute : धनुष आणि नयनतारा यांच्यात सध्या नयनताराची डॉक्युमेंटरी ‘नयनतारा: बियॉन्ड द फेअरी टेल’वरून वाद सुरू आहे. नयनताराने याच संदर्भात धनुषला खडेबोल सुनावत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर, नुकत्याच झालेल्या एका लग्नसोहळ्यात नयनतारा आणि धनुष सहभागी झाले, मात्र दोघांनी एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
निर्माते आकाश बास्करन यांच्या लग्नसोहळ्यात हे दोघे कलाकार उपस्थित होते. मात्र, दोघांनीही एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत कार्यक्रमात आपापल्या टीमबरोबर संवाद साधण्यावरच भर दिला. या लग्नसोहळ्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात दोघेही वेगवेगळ्या बाजूंना बसलेले दिसले.
व्हिडीओमध्ये धनुष आणि नयनतारा एकमेकांकडे पाहण्याचं टाळताना दिसले. दोघांनी एकमेकांकडे बघितलंसुद्धा नाही. धनुष आणि नयनतारा व्यासपीठाच्या समोरील पहिल्याच रांगेत बसले होते. दोघे एकाच रांगेत बसले होते, तरी त्यांनी एकमेकांकडे बघितलेसुद्धा नाही. धनुषचे लक्ष पूर्णपणे स्टेजकडे होते, तर नयनतारा एका पाहुण्याशी गप्पा मारताना दिसली.
नयनतारा या समारंभाला तिच्या पती आणि दिग्दर्शक विग्नेश शिवनबरोबर आली होती. ती गुलाबी साडीमध्ये अतिशय मोहक दिसत होती, तर विग्नेशने दाक्षिणात्य पारंपरिक लुंगी परिधान केली होती. धनुषनेही पांढरी लुंगी आणि पांढरा शर्ट असा पेहराव केला होता. कार्यक्रमात दोघांनी इतर पाहुण्यांशी संवाद साधला, मात्र एकमेकांकडे पाहणे किंवा बोलणे टाळले. लग्नसोहळ्यातील एका फोटोमध्ये अभिनेता शिवकार्तिकेयन नयनतारा आणि विग्नेश यांचे स्वागत करताना दिसतो.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा…‘या’ कारणामुळे शाहरुख खान सोडणार होता बॉलीवूड; दिल्लीला जाण्याची तयारी करत पकडलं होतं विमान, पण…
वादाचे कारण काय ?
अलीकडेच नयनताराने सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले होते, यात तिने धनुषवर तिला १० कोटींची कायदेशीर नोटीस पाठवल्याचा आरोप केला होता. ही नोटीस तिची डॉक्युमेंटरी ‘नयनतारा: बियॉन्ड द फेअरटेल’मध्ये ‘नानुम राऊडी धान’ या चित्रपटाचा तीन सेकंदांचा बिहाइंड द सीन्सचा व्हिडीओ वापरल्यावरून पाठवण्यात आली होती. धनुष हा ‘नानुम राऊडी धान’ या चित्रपटाचा निर्माता आहे. नयनताराच्या मते, या चित्रपटातील दृश्यांचा वापर करण्यासाठी धनुषकडे ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) मागण्यासाठी तिच्या टीमने दोन वर्षांमध्ये खूप वेळा प्रयत्न केले होते. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे नयनताराने तिच्या पर्सनल डिव्हाईसवर शूट करण्यात आलेला या सिनेमाचा एक लहान बिहाइंड द सीन्स व्हिडीओ वापरण्याचा निर्णय घेतला.
नयनताराची धनुषवर टीकात्मक पोस्ट –
हेही वाचा…आमिर खानने किरण राववर केला ‘हा’ आरोप; म्हणाला, “तिला माझ्या अभिनयावर…”
नयनताराच्या आयुष्यात ‘नानुम राऊडी धान’ चित्रपटाचे खास महत्त्व आहे, कारण याच चित्रपटाच्या सेटवर ती तिचा पती विग्नेश शिवनला पहिल्यांदा भेटली होती. धनुषने या चित्रपटाची निर्मिती केली होती.