दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय असलेली अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश हे त्यांच्या लग्नापासून खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना जुळी मुले झाल्याची गोड बातमी त्यांनी दिली होती. नयनताराचा पती दिग्दर्शक विग्नेश शिवन याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. जुळ्या मुलांचे आई-वडील झाल्याची घोषणा केल्यानंतर ते दोघेही चर्चेत आले. त्यानंतर आता त्यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या मुलांची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

आणखी वाचा : Bigg boss 16: अब्दू रोजिकने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

दिवाळीच्या शुभेच्छा देताना विग्नेशने त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत विग्नेश, नयनतारा आणि त्यांची दोन्ही मुले दिसत आहेत. यात नयनताराने केशरी रंगाची साडी नेसली असून विग्नेशने लाल रंगाचा कुर्ता आणि लुंगी नेसली आहे. तसेच नयनताराने तिच्या हातात एका मुलाला धरले आहे आणि विग्नेशने त्याच्या हातात दुसऱ्या मुलाला धरले आहे. हा फोटो पोस्ट करताना विग्नेशने लिहिले, “तुम्हा सर्वांना आमच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!” त्यांच्या हा फोटो सध्या खूप व्हायरल होत असून त्यांचे चाहतेही त्यांच्या मुलांची झलक पाहून खुश झाले आहेत.

हेही वाचा : नयनताराच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म; पण तामिळनाडू सरकारने दिले चौकशीचे आदेश, कारण…

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी ९ जूनला थाटामाटात लग्न केलं होतं आणि त्यानंतर ४ महिन्यातच दोघंही आई- बाबा झाले आहेत. लग्नाच्या ४ महिन्यांनंतर नयनतारा आई कशी काय झाली हा प्रश्नही अनेकांना सतावत होता. पण नयनतारा सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याची माहिती समोर आली. त्यांनी आपल्या बाळांची नावं उईर आणि उलगम अशी ठेवली आहेत.

Story img Loader