दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा हिने जून महिन्यात दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाला चार महिने उलटत नाही तोपर्यंत नयनतारा हिने चाहत्यांना दुसरी गुडन्यूज दिली आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच नयनतारा आई झाली आहे. नयनताराच्या घरी दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. नुकतंच विग्नेश शिवनने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली.
विग्नेश शिवनने नुकतंच ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्या बाळांच्या पायांचे चार फोटो शेअर केले आहे. या फोटोत ते दोघेही त्यांच्या पायांना प्रेमाने गोड किस करताना दिसत आहे. तर एका फोटोत नयनतारा ही बाळाच्या पायाकडे बघत गोड हसताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी ही गुडन्यूज दिली आहे.
आणखी वाचा : ‘बिग बॉस’च्या पहिल्याच आठवड्यात किरण माने पडणार घराबाहेर? प्रोमो व्हायरल
“नयन आणि मी आज आई-वडील झालो आहोत. आम्हाला दोन जुळी मुलं झाली आहेत. आमच्या प्रार्थना आणि पूर्वजांचे आशीर्वाद आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रुपाने मिळाले आहेत. आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. उईर आणि उलगम”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नयनतारा गरोदर असल्याचे वृत्त समोर आले होते. अनेकदा ते दोघेही काही लहान मुलांसोबत वेळ घालवतानाही दिसले होते. त्याचे फोटो शेअर करत विघ्नेशने मी भविष्यासाठी सराव करत आहे असे म्हटले होते. यानंतर ते दोघेही बाळाचा विचार करत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता या जोडप्याने हे गोड बातमी देऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नयनतारा आणि विग्नेशच्या बाळांचा जन्म सरोगसीच्या मदतीने झाल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : “डेनिमवर बांगड्या घातल्या म्हणजे…” ‘पछाडलेला’ चित्रपटातील अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
नयनतारा आणि विघ्नेश यांनी ९ जून रोजी चेन्नईत लगीनगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या लग्नाला सुपरस्टार शाहरुख खान, विजय सेतुपती आणि दिग्दर्शक अॅटली यांनी हजेरी लावली होती. लवकरच ती शाहरुख खानबरोबर चित्रपटात झळकणार आहे. येत्या २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.