दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन ९ जून रोजी लग्न बंधनात अडकले. ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी सप्तपदी घेतल्या. लग्नानंतर नयनतारा आणि विघ्नेश शिवन दुसऱ्याच दिवशी तिरुपती मंदिरात पोहोचले होते. त्या दोघांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. पण यावेळी नयनतारा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता तिला कायदेशीर नोटीसही जारी करण्यात येऊ शकते. कारण नयनतारा अनवाणी नाही तर चप्पल घालून फिरताना दिसली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्…

तिरुपती मंदिरात किंवा मग त्याच्या आवारात अनवाणी चालणे ही धार्मिक प्रथा आहे. तिथे नयनताराला चप्पल घातलेलं पाहून तिथले लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रिपोर्ट्सनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्डाचे मुख्य सिक्योरिटी ऑफिसर अधिकारी, नरसिंह किशोर यांनी सांगितले की, अभिनेत्री नयनतारा रस्त्यावर चप्पल घालून फिरताना दिसली. ज्याचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. यादरम्यान नवविवाहित जोडप्याने येथील नियमांचे उल्लंघन केले आहे. जिथे फोटो काढायला परवानगी नाही तिथे फोटो काढत होते. नयनतारा रस्त्यावर चप्पल घालून फिरताना दिसली. आमच्या सुरक्षेने यावर तातडीने कारवाई केली. त्यांनी तिथे फोटोशूटही केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमच्या लक्षात आले आहे.

आणखी वाचा : गुटखा खाण्याची प्रॅक्टिस! भूमिकेसाठी प्राजक्ता माळीने केली अशी तयारी

नरसिंह किशोर पुढे म्हणाले, “आम्ही नयनताराला नोटीस पाठवत आहोत. आम्ही त्यांच्याशी यावर चर्चा केली असता त्या स्वतः पत्रकारांना माफी मागणारा व्हिडिओ जारी करणार होत्या. मात्र, आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवत आहोत.”

आणखी वाचा : “आम्हाला एखाद्या राक्षसासारखं…”, NCB अधिकाऱ्यासमोर बोलताना शाहरुखला झाले अश्रू अनावर

आणखी वाचा : अँबर हर्ड विरोधात खटला जिंकवून देणाऱ्या वकिलासोबतच जॉनी डेप रिलेशनशिपमध्ये?

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की या चप्पलच्या वादानंतर नयनताराचा पती विघ्नेश शिवन याने पत्नीच्या वतीने ट्रस्टची माफी मागितली आहे. ते म्हणाले की, “तिरुपती मंदिरावर त्यांच्या पत्नीची खूप श्रद्धा आहे. ही चूक नकळत घडली. याआधी ते अनेकवेळा तिरुपती मंदिरात गेले आहेत.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nayanthara gets in legal trouble post wedding vignesh shivan at tirupati temple dcp