दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती दिग्दर्शक विग्नेश शिवन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्या दोघांनी जुळ्या मुलांचे आई-वडील झाल्याची घोषणा केल्यानंतर ते दोघेही चर्चेत आले आहेत. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांनी त्यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावरुन विविध चर्चा सुरु असताना आता यावर विग्नेशने याबद्दल मौन सोडले आहे.

विग्नेश हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्याने ९ ऑक्टोबर रोजी ट्विटरवर एक ट्विट केले होते. या ट्वीटद्वारे त्यांनी आई-वडील झाल्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यांनी त्यांच्या बाळांच्या पायाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ते दोघांनी सरोगसीच्या माध्यमातून नयनतारा-विग्नेश आई-वडील झाले असल्याचे बोललं जात आहे. पण त्यानंतर तामिळनाडू सरकारने या सरोगसीबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत यावर शंका उपस्थित केली होती. या सर्व चर्चांवर आता विग्नेशने स्पष्टपणे भाष्य केले आहे.
आणखी वाचा : सारा तेंडुलकरचा २५ वा वाढदिवस दणक्यात साजरा, फोटो पाहिलेत का?

विग्नेशने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तो म्हणाला, “प्रत्येक गोष्ट आपल्याकडे येण्याची एक ठराविक वेळ असते. ती योग्य वेळीच येते. त्यामुळे थोडं थांबा आणि कृतज्ञ राहा.” त्याच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. याआधीही विग्नेशने एक स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. त्यात त्याने म्हटले होते की, ज्यांना तुमची काळजी आहे त्यांच्याकडे लक्ष द्या. जे सदैव तुमच्या पाठीशी उभा असतात, ज्यांना तुमचे चांगले झालेले बघायचे आहे, तेच तुमचे खास आहेत. त्याची ही पोस्टही व्हायरल झाली होती. जुळ्या बाळावरुन सुरु झालेल्या चर्चांवर तो सतत विविध स्टोरी शेअर करत आहे. पण अद्याप त्याने अधिकृतरित्या काहीही भाष्य केलेले नाही.

Nayanthara-Vignesh Surrogacy

आणखी वाचा : लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच अभिनेत्री नयनतारा झाली आई, घरी जुळ्या मुलांचे आगमन

नयनतारा आणि विघ्नेश यांनी ९ जून रोजी चेन्नईत लगीनगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नाला चार महिने उलटत नाही तोपर्यंत नयनताराने चाहत्यांना दुसरी गुडन्यूज दिली. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच ती आई झाली आहे, अशी अधिकृत घोषणा त्या दोघांनी केली. नयनताराच्या घरी दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. नुकतंच विग्नेश शिवनने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली.

“नयन आणि मी आज आई-वडील झालो आहोत. आम्हाला दोन जुळी मुलं झाली आहेत. आमच्या प्रार्थना आणि पूर्वजांचे आशीर्वाद आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रुपाने मिळाले आहेत. आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. उईर आणि उलगम”, असे त्याने ही पोस्ट करताना म्हटले होते.

Story img Loader