बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) गेल्या महिन्यातच अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) क्लीन चिट दिली आहे. तपास यंत्रणेने सादर केलेल्या आरोपपत्रात त्याचे नाव नाही. आता २४ वर्षीय आर्यनचे एक विधान मीडियामध्ये व्हायरल होत आहे, जे त्याने कोठडीदरम्यान एनसीबीला दिले होते. एनसीबीच्या एका अधिकाऱ्यानेच याबाबत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : अँबर हर्डची ११६ कोटीची नुकसान भरपाई जॉनी डेप करणार माफ, पण ‘या’ अटीवर; वकिलांनी केला खुलासा

एनसीबीचे उपसंचालक संजय सिंग हे स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमचे नेतृत्व करत होते. आर्यन त्यांना म्हणाला, ‘सर, तुम्ही मला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर बनवले आहे, जणू काही मी ड्रग स्मगलिंगला फायनान्स करत आहे. हे आरोप निराधार नाहीत का? त्या दिवशी माझ्या लोकांकडून त्यांना कोणतेही ड्रग्ज मिळाले नाही आणि तरीही त्यांनी मला अटक केली.

आणखी वाचा : अँबर हर्ड विरोधात खटला जिंकवून देणाऱ्या वकिलासोबतच जॉनी डेप रिलेशनशिपमध्ये?

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ची कहाणी खोटी म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहंना, विवेक अग्निहोत्रीने दिले उत्तर

माझ्याविरुद्ध काही पुरावे नसतानाही मला इतके दिवस तुरुंगात ठेवायचे कारण काय? असा प्रश्न आर्यनने विचारल्याचेही संजय यांनी सांगितले. आर्यन संजय यांना पुढे म्हणाला, ‘सर, तुम्ही माझ्यासोबत खूप अन्याय केला आहे आणि माझी इज्जत धुळीस मिळाली. मला इतके आठवडे तुरुंगात का घालवावे लागले, मी खरोखर या लायक होतो का? २८ मे रोजी एनसीबीने आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये म्हटले होते की, तपासनी दरम्यान आर्यनकडून कोणतेही ड्रग्स सापडले नाहीत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncb official reveals aryan khan had said you have ruined my reputation did i really deserve it dcp