सध्या देशात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट तुफान कमाई करत असताना चित्रपटावर मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवल्याचा आरोपही केला जात आहे. हा चित्रपट जातीयवादी आणि विशिष्ट राजकीय विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी बनवला गेला आहे, असे आरोपही या चित्रपटावर होत आहेत. या वादादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या चित्रपटाबद्दल वक्तव्य केलं आहे. सत्तेतले लोक या चित्रपटाचं प्रमोशन करतायत हे दुर्दैव असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीविषयी ANI ने ट्वीट करत माहिती दिली. यात शरद पवार ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर निशाणा साधत म्हणाले, “एका माणसाने चित्रपट (द काश्मीर फाईल्स) बनवला असून त्यात हिंदूंवर होणारे अत्याचार दाखवले आहेत. या सिनेमात असं दाखवण्यात आलंय की बहुसंख्याक नेहमीच अल्पसंख्याकांवर हल्ले करतात आणि जेव्हा मुस्लीम बहुसंख्य असतात तेव्हा हिंदू समाज असुरक्षित होतो. सत्तेतील लोक या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत हे दुर्दैव आहे.”

आणखी वाचा : “दुश्मन…”, देवेंद्र फडणवीस यांना पाहून एकनाथ खडसेंनी गायलेल्या गाण्याची होतेय चर्चा

आणखी वाचा : अनुष्का शर्मा मराठमोळ्या जेवणाच्या प्रेमात, फोटो शेअर करत म्हणाली…

११ मार्च रोजी ‘द काश्मीर फाइल्स’ रिलीज झाला होता. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने एका महिन्यात सुमारे २५० कोटी रुपयांचा गल्ला केला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chief sharad pawar criticizes the kashmir files director vivek agnihotri and people with power dcp