गेल्या काही दिवसांपासून ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठीतील ऐतिहासिक चित्रपटाची सातत्याने चर्चेत आहे. याची घोषणा झाल्यापासूनच त्याची चर्चा आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून या चित्रपटातील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यावरुन त्याला ट्रोल केले जात आहे. नुकतंच या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाशी अक्षय कुमारचं नाव जोडलं गेलं. त्यानंतर या चित्रपटामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे अनेकांना धक्का बसला होता. अक्षय ही भूमिका साकारणार असल्याचं कळताच अनेकांनी त्याला ट्रोलही केलं. त्यानंतर आता त्याचा लूक समोर आल्यानंतरही त्याला टीकेला सामोरी जावं लागत आहे.
आणखी वाचा : Video : अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ समोर, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या चित्रीकरणाला सुरुवात

नुकंतच या संपूर्ण प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही फोटो शेअर केले आहे. त्या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी यावर टीका केली आहे.

“जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय… ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला “वेड्यात” काढलं जातयं असं वाटतं”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
आणखी वाचा : “मी २०१८ पासूनच निश्चित होतो कारण…” महेश मांजरेकरांच्या लेकाने सांगितला पडद्यामागचा किस्सा

दरम्यान ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे. तर संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे, प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर महेश मांजरेकरांचा मुलगा सत्य मांजरेकर, बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे.