महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीमत्वांपैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे रोहित पवार. शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून ते कायमच चर्चेत असतात. महाविकासआघाडीची सत्ता असताना आणि आता सत्ता गेल्यानंतरही ते सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. रोहित पवारांनी नुकतंच ट्विटरवर आस्क मी हे सेशन घेतले. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी रविवारी ९ एप्रिलला #AskRohitPawar हे सेशन आयोजित केले होते. यावेळी अनेक नेटकऱ्यांनी त्यांना राजकारण, खासगी आयुष्य, मनोरंजनसृष्टीतील विविध प्रश्न विचारले. या सर्वच प्रश्नांना रोहित पवारांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
आणखी वाचा : रोहित पवार शर्ट इन का करत नाही? पायात कोल्हापुरीच का घालतात? स्वत:च केला खुलासा
या सेशनदरम्यान एका व्यक्तीने रोहित पवारांना हटके प्रश्न विचारला. “उत्कृष्ट कलाकार, नाना पाटेकर की नरेंद्र मोदी”, असा प्रश्न त्या नेटकऱ्याने रोहित पवारांना विचारला. त्याबरोबर त्याने हसतानाचे इमोजीही पोस्ट केले.
त्या नेटकऱ्याचा प्रश्न ऐकून रोहित पवारांनीही हटके पद्धतीने उत्तर दिले. “या दोन ऑप्शनवरून तुम्हाला राजकारणाबद्दल आणि अक्टिंगबद्दल बरच कळतं असं दिसतंय. उत्तर तुम्हालाही माहिती आहे आणि लोकांनाही कळलंय..” असे रोहित पवार या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
आणखी वाचा : “…तरच लग्न करेन”, अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना लग्नापूर्वी घातलेली अट
“जर तुमचा बायोपिक करायचं ठरलं, तर तुमच्या व्यक्तीरेखेसाठी तुमची निवड कोण असेल? वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर? असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी “माझा रोल मलाच करायला आवडेल.” असे उत्तर दिले.