सध्या देशात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट तुफान कमाई करत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आतापर्यंत अनेकदा या चित्रपटाचा उल्लेख करत विरोध दर्शवला आहे. काश्मीर फाइल्सच्या माध्यमातून भाजपा धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती. देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपाचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, असे शरद पवार म्हणाले. त्यानंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांनी त्यांच्या विरोधात मोहीम सुरु केली आणि १९९३ मधील शरद पवारांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबतच भाजकाच्या कार्यकर्ता प्रीती गांधी यांनी एक पोस्ट शेअर करत शदर पवारांवर वक्तव्य केलं आहे.
प्रीती गांधी यांनी ट्विटरवर एक ट्वीट शेअर केलं आहे. हे ट्वीट करत प्रीती गांधी म्हणाल्या, “शरद पवार यांनी मुंबईच्या १९९३ च्या बॉम्बस्फोटात १३ व्या ठिकाणी बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती हेतूपूर्वक दिली होती. मुस्लीम बहूल मस्जिद बंदर भागात तेरावा स्फोट झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं होतं. मात्र, बॉम्बस्फोट झालेली १२ ठिकाणं ही हिंदू बहूल होती. यानंतर शरद पवार यांनी त्या घटनेमागे तामिळ टायगर्सचा हात असल्याचे पुरावे मिळाल्याचं सांगितलं होतं. तेच शरद पवार काश्मिरी पंडितांविषयी बोलताना तो चुकीचा प्रोपोगंडा असल्याचं म्हणतात हे लज्जास्पद आहे.”
शरद पवार यांनी द काश्मीर फाईल्स संदर्भात वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांनी त्यांच्या विरोधात मोहीम सुरु केली आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल शरद पवार यांनी जी माहिती दिली होती. त्या माहितीवरुन शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. प्रीती गांधी यांनी शरद पवार यांचा २००६ साली १९९३ च्या हल्ल्यावर वक्तव्यं केलं आहे. त्यानंतर ट्वीटरवर शरद पवार यांचं नावं ट्रेंड होऊ लागलं आहे.
आणखी वाचा : “…असले घाण आरोप कोणी लावू नका”, विशाखा सुभेदारने घेतला ‘हास्य जत्रा’ सोडण्याचा निर्णय
काय म्हणाले होते शरद पवार?
काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजपा गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी गुरुवारी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा : Live Chat दरम्यान पतीच्या कर्करोगाविषयी बोलताना अभिज्ञा भावे झाली भावूक, म्हणाली…
शरद पवार यांनी ‘द काश्मीर फाईल्सवर गेल्या आठ दिवसात दोन वेळा भाष्य केलं आहे. काश्मीरमधून काश्मीरी पंडितांना हाकलून लावण्यात आलं हे खरं असलं त्यावेळी मुस्लीमांना देखील लक्ष्य करण्यात आलं होतं, असं शरद पवार म्हणाले. पाकिस्तानातील दहशतवादी गट काश्मीरी पंडित आणि मुस्लीमांवरील हल्ल्यांना कारणीभूत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील अल्पसंख्यांक सेलला संबोधित करताना हे वक्तव्य केलं होतं.
आणखी वाचा : मृणाल दुसानीसच्या घरी चिमुकलीचे आगमन; फोटो शेअर करत सांगितले नाव
मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर शांतता राखली जावी यासाठी शरद पवारांनी बाँबस्फोटामुळे हिंदू-मुस्लिम दंगल होऊ नये म्हणून १२ नव्हे तर १३ बॉम्बस्फोट झालेत आणि तेरावा बॉम्बस्फोट मस्जिद बंदरला झालाय, असं टीव्हीवर येऊन सांगितलं होतं. शांततेसाठी पवार दुसऱ्यांदा खोटं बोलले बॉम्बस्फोटांनंतर हिंदू-मुस्लिमांतले वैर वाढू नये म्हणून पवारांनी आणखी एक खोटी माहिती सांगितली. बॉम्बस्फोटांमध्ये तमिळ टायगर्स या संघटनेचा हात असल्याचे पुरावे मिळत आहेत असं पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी या घटनेचा उल्लेख ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या पुस्तकात केला आहे. त्याचा एक व्हिडीओ भाजप समर्थकाने ट्वीटरवर शेअर केला आहे.