हॉकी या खेळावर आधारित अभिनेता अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. देशाच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगावर हा चित्रपट भाष्य करतो. स्वतंत्र भारतासाठी हॉकी या खेळात सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न तपन दासचं असतं आणि त्याच स्वप्नपूर्तीसाठी तो खेळाडूंना कशाप्रकारे एकत्र आणतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. कथेत वास्तविकता यावी यासाठी दिग्दर्शकाने बरीच मेहनत घेतली असून काही दृश्यांसाठी तब्बल दोन हजार कलाकारांचा फौजफाटा त्यांनी जमवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

स्वातंत्र्यपूर्वीचा काळही चित्रपटात दाखवण्यात आल्याने भारतीयांसोबतच ब्रिटिश ज्युनियर आर्टिस्टनाही घेण्यात आले आहे. हॉकीवर आधारित या चित्रपटासाठी महत्त्वपूर्ण कलाकारांना हॉकीचं विशेष प्रशिक्षणदेखील देण्यात आलं होतं.

Bigg Boss Marathi : राजेशने ओलांडल्या मर्यादा; रेशमचा धक्कादायक आरोप

खेळाच्या पार्श्वभूमीवर देशप्रेमाची किनार असणारं कथानक ‘गोल्ड’ या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. यामध्ये अक्षय तपन दास ही भूमिका साकारत आहे. स्वतंत्र भारतासाठी हॉकी खेळण्याचा स्वप्न पाहणारा तपन दास हॉकी टीमचा सहाय्यक व्यवस्थापक असतो. रिमा कागती दिग्दर्शित ‘गोल्ड’ची निर्मिती एक्सेल एण्टरटेनमेन्ट करत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ साली लंडनमध्ये झालेल्या १४व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले होते, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. अक्षय कुमारसोबतच यामध्ये मौनी रॉय, कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंग, सनी कौशल आणि निकीता दत्ता यांच्याही भूमिका आहेत. १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.