आगामी चित्रपट ‘बुलेट राजा’मध्ये सैफ अली खानला घेण्यामागच्या कारणाचा खुलासा दिग्दर्शक तिग्मांशु धुलियाने केला आहे. चित्रपट सुपरहिट व्हावा आणि तिकीट बारीवर चांगली कमाई करावी यासाठी सैफ अली खानला चित्रपटात घेण्यात आल्याचे तिग्मांशु म्हणाला.
‘हासिल’, ‘साहेब बीवी और गँगस्टर’ आणि ‘पानसिंग तोमर’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणा-या तिग्मांशुला बॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांमध्ये सुपरस्टार्सचे असणे गरजेचे आहे असे वाटते. तिग्मांशु म्हणाला की, जेव्हा तुम्ही बिग बजेटचा चित्रपट बनवता त्यावेळी तुमच्यावर एक प्रकारचा दबाव असतो. त्यामुळे चित्रपटात असा अभिनेता घ्यावा, जो तुमचा चित्रपट चालवू शकेल. अशा बजेटच्या चित्रपटांना केवळ सैफचं न्याय देऊ शकतो, असे मला वाटते.
‘बुलेट राजा’मध्ये सैफसोबत सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका आहे. आता, सुपरस्टार्स असलेला हा चित्रपट खरचं सुपरहिट होतो का ते २९ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळू शकेल. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा