माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचे तेरावे पर्व सध्या चर्चेत आहे. केबीसी १३मध्ये हजेरी लावणारे कलाकार आणि अमिताभ बच्चन यांच्यामधील संवाद विशेष चर्चेचा विषय ठरतात. नुकताच या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी हजेरी लावली आहे. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. दरम्यान, गुलजार यांच्यासोबत टेनिस खेळण्याचा देखील अनुभव सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर केबीसी १३च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नीना गुप्ता त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अमिताभ बच्चन यांच्याशी शेअर करताना दिसत आहेत. दरम्यान अमिताभ यांनी ‘नीनाजी आम्ही ऐकले आहे की तुम्ही खूप टेनिस खेळला होतात’ असे म्हटले आहे. त्यावर नीना गुप्ता यांनी गुलजार यांच्यासोबत टेनिस खेळतानाचा अनुभव सांगितला आहे.
आणखी वाचा : दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही इम्रान हाश्मीला किस करत होती अभिनेत्री, शूटिंग दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

‘मी आणि गुलजार साहेब खूप आधी टेनिस खेळायचो. ते अंधेरीला टेनिस खेळायला जात असत. एक एक तास टेनिस खेळायचे. मी एकदा त्यांना जाऊन म्हटले की मलाही टेनिस खेळायला आवडेल. तेव्हा ते म्हणाले की तूही माझ्यासोबत खेळायला चल. ते मला रोज सकाळी सहा वाजता घ्यायला यायचे. मी अर्ध्या तासात टेनिस खेळून थकत असे. मग मी त्यांना टेनिस खेळताना पाहात असत. ते खूप छान टेनिस खेळायचे’ असे नीना म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, ‘सुरुवातीला टेनिस खेळायला जात असताना मी गुलजार यांना म्हटले की सर जेव्हा बाहेर जायचे असेल तेव्हा मला टेनिस खेळताना घालतात तो स्कर्ट हवा आहे. जसं की मार्टीना घालते. मी गुलजार यांच्याकडे टेनिस स्कर्ट मागितला आणि ते ऐकून गुलजार साहेब माझ्यावर प्रचंड चिडले. पहिले खेळ कसा खेळायचा हे तर शिक स्कर्ट विषयी नंतर विचार कर असे म्हणाले.’ नीना यांचे बोलणे ऐकून सर्वाना हसू अनावर होते.