दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या नीना गुप्ता यांच्या करिअरप्रमाणेच त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही बऱ्याच गोष्ट चर्चेत असतात. सध्या नीना यांच्या करिअरची सेकंड इनिंग सुरु असून याचदरम्यान त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवरचा पडदा दूर सारला. इतकंच नाही तर एक खंबीर आणि कणखर महिला म्हणून ओळख असलेल्या नीना यांना त्यांच्या प्रियकराने शिवीगाळ करत मारहाण केल्याचं सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रिपब्लिक वर्ल्ड’नुसार, वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांचं अफेअर होते. या दोघांना मसाबा ही मुलगीदेखील आहे. परंतु या दोघांनी लग्न केलं नाही. त्यामुळे त्यांनी एकटीने आपल्या मुलीचा सांभाळ केला. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या नातेसंबंधांविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

“आयुष्यामध्ये मी कायम खंबीर आणि कणखर भूमिका घेत आले आहे. आज माझी खंबीर स्त्री म्हणून ओळख असली तरीदेखील मी सुद्धा कधीकाळी अन्याय सहन केला आहे. माझ्यावरही अत्याचार झाले आहेत. माझ्या एका प्रियकराने माझी फसवणूक केली होती. त्याने माझा खूप छळ केला. शिवीगाळ करत मारहाणही केली”, असं नीना गुप्ता यांनी सांगितलं.

वाचा :  Bigg Boss 13 : शहनाजने केलं सिद्धार्थसोबत प्रेमाचं नाटक?

पुढे त्या म्हणतात, “तरुण असताना मी एकाच्या प्रेमात पडले. तो सुद्धा माझ्यावर प्रेम करायचा. त्याचदरम्यान त्यांचं अन्य एका मुलीसोबत लग्न ठरलं होतं. परंतु जर त्या मुलीने लग्नाला नकार दिला तर मी तुझ्या लग्न करेन असं माझ्या प्रियकराने मला सांगितलं. मात्र तसं झालं नाही. इतर महिलांप्रमाणेच माझ्या आयुष्यातदेखील काही प्रॉब्लेम आले. मात्र त्यांच्यात आणि माझ्यात एक फरक आहे. तो म्हणजे मी या साऱ्यातून बाहेर पडले”.

वाचा :  जाणून घ्या, केळींच्या सालीचे गुणधर्म आणि फायदे

दरम्यान,नीना गुप्ता यांच्या करिअरची सेकंड इनिंग सध्या जोरदार सुरु आहे. ‘मुल्क’, ‘बधाई हो’ या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या नीना लवकरच ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट समलैंगिक व्यक्तींच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neena gupta reveals that she was tortured by her boyfriend ssj