नीरज पांडे आणि अक्षय कुमार यांच्या २०१३ साली आलेल्या ‘स्पेशल २६’ चित्रपटाने चांगली कामगिरी केली. आपल्या या यशस्वी वाटचालीला पुढे नेत ही जोडगोळी आगामी चित्रपटावर काम करीत आहे. नीरज या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून, विक्रम मल्होत्राबरोबर सहाय्यक निर्माता म्हणून चित्रपटाची निर्मितीदेखील करीत आहे. देशभक्तीच्या पार्श्वभूमीवर आधारीत हा एक अॅक्शन चित्रपट आहे. याच कारणास्तव या चित्रपटाचे प्रदर्शन २०१५ सालच्या प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू असून, चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी योग्य कलाकारांच्या नवडीचे काम सुरू आहे. चित्रपटाच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आली नसून, एप्रिल किंवा मे महिन्यात चित्रिकरणाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Story img Loader