बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच ही गोड बातमी त्यांनी चाहत्यांना दिली. आलियाचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आलिया-रणबीरच्या बाळाची चाहतेही उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता आलियाच्या डोहाळे जेवणाबद्दल माहिती समोर आली आहे.
कपूर कुटुंबीयदेखील नवीन पाहुणाच्या आगमनासाठी आतुर आहेत. आलियाच्या डोहाळे जेवणाची तयारी कपूर कुटुंबीयाच्या घरी सुरू करण्यात आली आहे. आलियाच्या सासू आणि अभिनेत्री नीतू कपूर तिच्या डोहळे जेवणाची तयारी करत आहेत. त्यांच्यासह आलिया भट्टची आई सोनी राजदानदेखील तयारी करण्यासाठी उत्सुक आहेत. ‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, आलियाच्या डोहाळे जेवणासाठी जय्यत तयारी करण्यात येणार असून फक्त महिलाच या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा >> IAS अधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांना सोनू सूदचा मदतीचा हात; स्कॉलरशिप आणि ऑनलाइन क्लासेसची सुविधा देणार
हेही वाचा >> नंदुरबारमधील विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणावरून हेमंत ढोमे संतापला, म्हणाला “आपले आदिवासी विकासमंत्री…”
आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मुंबईत होणार असल्याची माहिती आहे. लग्नाप्रमाणेच आलियाचं बेबी शॉवरही कपूर कुटुंबीयाच्या घरी होणार की आणखी कुठे, याबद्दल माहिती मिळालेली नाही. परंतु, तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, या कार्यक्रमात करीना कपूर खान, करिश्मा कपूर, आकांक्षा रंजन सिंह, नव्या नंदा, आरती शेट्टी सहभागी होणार आहेत. आलियाही तिच्या प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करताना दिसत आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट चांगली कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्याच आठवड्यात ‘ब्रह्मास्त्र’ने १५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.