बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसते. सध्या दोघांच्याही चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. अशात आता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी आलिया- रणबीरच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नीतू कपूर यांनी पॅपराजींच्या प्रश्नाचं उत्तर देताना या दोघांच्या लग्नाबाबत सर्वांना इशारा दिला आहे.

नीतू कपूर यांनी नुकतीच ‘डान्स दिवाने’च्या सेटवर हजेरी लावली. यावेळी काही फोटो ग्राफर्सनी त्यांना आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत प्रश्न विचारले. ‘सून घरी कधी येणार?’ असा प्रश्न देखील यावेळी नीतू कपूर यांना विचारण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर देताना नीतू कपूर यांनी वर आभाळाकडे पाहत ‘आता हे देवालाच माहीत’ असा इशारा केला. नीतू कपूर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. फोटोग्राफर विरल भयानी यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Premachi Goshta actress Swarda Thigale react on troller
“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”
Tharla Tar Mag Promo
ठरलं तर मग : अर्जुन पोहोचला बायकोच्या माहेरी, एकत्र पतंग उडवताना मधुभाऊंची एन्ट्री! पुढे जावयाने केलं असं काही…; पाहा प्रोमो
zaheer iqbal Shatrughan Sinha birthday video
Video: रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हांच्या पाया, तर झहीरने…; सोनाक्षी सिन्हाच्या दोन्ही भावांची लग्नानंतर ‘या’ सेलिब्रेशनलाही गैरहजेरी

आणखी वाचा- “त्यांच्यासाठी मी बदनाम अभिनेत्री…” विनोद मेहरांच्या आईबाबत रेखा यांनी केला होता खुलासा

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी २०१८ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर अलिकडेच या दोघांनी वाराणसीमध्ये चित्रपटचं अखेरचं शूटिंग पूर्ण केलं. तब्बल ५ वर्षांनंतर या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि यानिमित्तानं आलिया- रणबीर पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. दरम्यान चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आलिया आणि रणबीर लग्नाच्या बेडीत अडकणार अशी चर्चा सुरू आहे.

आणखी वाचा- “मला वेड्या कुत्र्याने…” गर्लफ्रेंड अलियाशी लग्न करण्याच्या प्रश्नावर रणबीरची प्रतिक्रिया चर्चेत

दरम्यान मागच्या महिन्यात काही रिपोर्ट्सनी असा दावा केला होता की, आलिया आणि रणबीर कपूर एप्रिल महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. हा एक खासगी विवाहसोहळा असणार आहे आणि यात केवळ आलिया- रणबीरचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार उपस्थित असणार आहे. याशिवाय रणबीर कपूरची आत्या रिमा जैन यांनी रणबीर आणि आलिया लवकरच लग्न करणार आहे असं एका मुलाखतीत सांगितलं होतं मात्र ते लग्न कधी करणार याचा खुलासा त्यांनी केला नव्हता.

Story img Loader