बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. नीतू या ‘जुग जुग जीयो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करत आहेत. काही दिवसांपूर्वी नीतू यांनी सोशल मीडियावर त्यांचे आणि ऋषी कपूर यांच्यासोबतचे लग्नाचे फोटो शेअर केले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नीतू यांनी सांगितले की त्या दोघांच्या लग्नात आमंत्रित न केलेल्या लोकांनीही हजेरी लावली आहे. यासोबत त्यांनी आणि ऋषी यांनी सप्तपदी घेण्याआधी ब्रॅन्डी या मद्याचे सेवन केले होते.
आणखी वाचा : ‘Love You’, अखेर सई ताम्हणकरने प्रेमाची दिली कबुली, दौलतरावांच्या ‘त्या’ पोस्टवर केली कमेंट
नीतू नुकतीच ‘जुग जुग जिओ’ चित्रपटातील सहकलाकार अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत ‘स्विगीच्या यूट्यूब चॅनल’ला मुलाखत दिली होती. वरुणने नीतू यांना विचारले की त्या अनिल कपूर यांच्या लग्नात गेल्या होत्या का? यावर अनिल मध्येच म्हणाले की, “मी माझ्या लग्नात नव्हतो. माझ्या लग्नात इतके कमी लोक होते की मला स्वतःला शोधावे लागले.” दरम्यान, नीतू म्हणाल्या की, “अनिलच्या लग्नात फक्त पाच जण होते, तर माझ्या लग्नात पाच हजारांहून अधिक लोक होते. पाहुण्यांची एवढी गर्दी पाहून ऋषी आणि मी घाबरलो. कारण आम्ही गर्दीला घाबरतो. मग ऋषी आणि मी ब्रँडी हे मद्य प्यायलो आणि सप्तपदी घेतल्या. सप्तपदी दरम्यान आम्ही दोघे नशेत होतो.”
आणखी वाचा : “हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदेंचा फोन आला, म्हणाले…”, शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत
आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर
नीतू पुढे म्हणाल्या, “अरे देवा! माझ्या लग्नात पाकीटमार उपस्थित होते. त्यांनी आम्हाला भेटवस्तू म्हणून दगड आणि चप्पल दिली. सर्वांनी चांगले कपडे घालून लग्नाला हजेरी लावली, त्यामुळे आम्ही त्यांना ओळखू शकलो नाही. लग्नानंतर आम्ही भेटवस्तू उघडल्या तेव्हा त्यात दगड आणि चप्पल निघाले ते खरोखरच विचित्र होते.”
नीतू आणि ऋषी यांचा विवाह २२ जानेवारी १९८० रोजी आरके हाऊसमध्ये झाला होता.