पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सेल्फी विथ डॉटर’ योजनेवर अभिनेत्री नेहा धुपिया हिने बुधवारी अप्रत्यक्ष शरसंधान केल्यानंतर तिच्यावर समाजमाध्यमांतून मोदी समर्थकांनी टीकेची झोड उठवली.
नेहा धुपिया हिने ‘सेल्फी’ची संकल्पना आणि योग साधनेची सक्ती म्हणजे सुशासन नव्हे. मुसळधार पावसाने मुंबई तुंबली. संपूर्ण शहराचा कारभार काही क्षणांत ठप्प झाला. आता या साऱ्या परिस्थितीवर ‘सेल्फी’ आणि योग साधना कामाला येणार का, हा सवाल तिने उपस्थित केल्याने मोदी समर्थकांनी प्रत्युत्तरादाखल तिच्यावर टीकेची झोड उठवली. नेहा हिने अभिनेत्री म्हणून केवळ उथळ प्रसिद्धी मिळविण्याच्या प्रयत्नात पंतप्रधानांच्या संकल्पनेवर टीका केली आहे. तिला असे सांगून नेमके काय साधायचे आहे, असे विचारत ‘सेल्फी विथ डॉटर’चे समर्थक सरसावले.
सेल्फीने महिलांच्या समस्या सुटणार नाहीत- रिचा चड्डा
यापूर्वी अभिनेत्री रिचा चड्डा, श्रुती सेठ आणि सामाजिक कार्यकर्त्या कविता कृष्णन यांनीही मोदींच्या सेल्फी विथ डॉटर मोहिमेवर टीका केली होती. सेल्फी किंवा अशाप्रकारच्या योजनांनी महिलांच्या समस्या सुटणार नसल्याचे अभिनेत्री रिचा चड्डाने म्हटले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा