अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला ‘अ थर्सडे’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील यामी गौतमच्या भूमिकेसोबतच अभिनेत्री नेहा धुपियाच्या भूमिकेचंही जोरदार कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटात ती एका प्रेग्नन्ट पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली. पण या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं तेव्हा नेहा खरंच ८ महिन्यांची प्रेग्नन्ट होती. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नेहानं तिची प्रेग्नन्सी आणि त्यावरून काही निर्मात्यांनी तिला दिलेल्या वर्तनुकीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन मुलांची आई असलेल्या नेहा धुपियानं ‘अ थर्सडे’मध्ये दमदार अभिनय केला आहे. तिच्या या भूमिकेचं कौतुकही झालं. दरम्यान ‘इंडिया डॉटकॉम’ला दिलेल्या मुलाखतीत नेहानं तिच्या प्रेग्नन्सीबाबत भाष्य केलं आहे. यावेळी तिच्या प्रेग्नन्सीबाबत समजल्यावर तिला निर्मात्यांनी कशी वागणूक दिली याचा खुलासा तिने केला. प्रेग्न्सीबाबत समजल्यानंतर अनेक प्रोजेक्ट तिच्याकडून काढून घेतल्याचं नेहानं तिच्या अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

नेहा म्हणाली, ‘मी जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नन्ट होते त्यावेळी माझ्याकडे बरेच प्रोजेक्ट होते. मला प्रेग्नन्सीमध्येही काम करायचं होतं कारण ही कोणतीही समस्या नाही. पण जेव्हा मी निर्मात्यांना सांगितलं की मी प्रेग्नन्ट आहे. त्यावेळी त्यांनी मला प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवला. पण हे सर्व खरंच ठीक होतं का? यात समस्या काहीच नव्हती. शरीरात बदल होतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ही भूमिका साकारू शकत नाही.’

नेहा पुढे म्हणाली, ‘मी ‘अ थर्सडे’मध्ये केलेली भूमिका ही प्रेग्नंट महिलेची नव्हती. जेव्हा मी निर्मात्यांना सांगितलं की, मी प्रेग्नन्ट आहे त्यावेळी हा प्रोजेक्टही माझ्या हातून जाईल असं मला वाटलं होतं. पण सर्व याच्या उलट झालं. त्यांनी स्क्रिप्टमध्येच काही बदल केले आणि माझी भूमिका एका प्रेग्नन्ट महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत बदलली. हे खूपच अनपेक्षित होतं. जेव्हा मी ऑफिसमध्ये हे सांगितलं की मी ५ महिन्यांची प्रेग्नन्ट आहे. तर त्यांनी मला विचारलं तुला स्वतःला ही भूमिका साकारायची आहे की रिप्लेस करायचं आहे. निर्णय तुझा असेल. चित्रपट तुझा आहे आणि आम्ही तुला रिप्लेस करू इच्छित नाही.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha dhupia reveal that makers thrown her out of the projects after knowing she is pregnant mrj